Wednesday, October 23, 2024
Homeविशेष लेखज्योती बसू : पक्ष निर्णयानुसार पंतप्रधान पद नाकारणारे, पश्चिम बंगालचे सलग २३...

ज्योती बसू : पक्ष निर्णयानुसार पंतप्रधान पद नाकारणारे, पश्चिम बंगालचे सलग २३ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नेते

कॉम्रेड ज्योती बसू 23 वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. देशातील महत्वाच्या राजकीय नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. 1975 च्या आणीबाणीच्या कालखंडात काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांनी बंगालमध्ये  कम्युनिस्ट पक्षावर दडपशाही सुरू केली. त्या काळात पक्ष कार्यालये बंद करण्यात आली होती. कॉम्रेड ज्योती बसू यांनी बंगाल मधील कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना भूमिगत राहण्याचे आदेश दिले, स्वतः भूमिगत राहून आणीबाणी विरोधात मोठा संघर्ष केला. आणीबाणी समाप्त झाल्यावर जनतेने त्यांना बंगालचे मुख्यमंत्री बनवले. बंगाल सह देशभरातील कम्युनिस्ट चळवळीतील कार्यकर्त्यांचे ते प्रेरणास्थान होते.

इंग्लंड येथून कायद्याची पदवी घेऊन भारतात परतल्यानंतर बसू यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला पूर्णवेळ वाहून घेतले. १९४४ ला बसू ट्रेड युनियनमध्ये कार्यरत झाले. १९४६ च्या निवडणुकांत काँग्रेसचे उमेदवार हुमायुन कबिर यांचा रेल्वे मतदारसंघातून पराभव करून बसू यांनी राजकीय पटलावर प्रवेश केला. स्वातंत्र्यानंतर कम्युनिस्ट पक्षावर बंदी आणल्यानंतर ते भूमीगत होते.

विशेष लेख : वन निवासींवरील अन्याय थांबवा ! – डॉ. अजित नवले

बंगालमध्ये ट्रामचे भाडे वाढवल्याच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे त्यांना अटकही झाली होती. १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी बसूंना बरनगोरे मतदारसंघातून राय हरेंदनाथ चौधरी यांच्या विरोधात निवडून दिले. १९६७ आणि १९६९ मध्ये बसूंनी पश्चिम बंगालचे उपमुख्यमंत्रीपद सांभाळले. त्यानंतर आठ वर्षांनी ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले. ही धुरा त्यांनी सलग २३ वर्षे सांभाळली. बसूंच्या ६० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीदीर्त अनेकदा त्यांचे राजकीय कौशल्य पणाला लागले होते. 

१९८० मध्ये त्यांनी काँग्रेसेतर मुख्यमंत्र्यांची बैठक कोलकातात घेतली होती. केंदातील काँग्रेस सरकारच्या धोरणांच्या विरोधात देशांतील मुख्यमंत्र्यांना एकत्र आणण्याचा तो प्रयत्न होता. बंगाल मध्ये १९७७ मध्ये सत्तेवर येताच बसूंनी जमीन सुधारणेवर लक्ष दिले. 

विशेष : ओडिशात आदिवासींवर कंपनी – सरकार चे जुलमी राज्य – डॉ. संजय दाभाडे

‘ऑपरेशन बरगा’द्वारे हिश्शांवर शेती करणाऱ्या दहा लाख लोकांना त्यांनी जमिनीचा हक्क मिळवून दिला आणि याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांची सहानभूती मिळवण्यात झाला. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याबाबत ज्योति बसु यांनी कधीही सार्वजनिक किंवा खासगीरित्या याबाबत आपली भूमिका मांडली नाही.

त्यांनी आपल्या साधेपणाची आणि पक्षावरील निष्ठेची प्रतिमा कधीही डागाळू दिली नाही. त्यांच्या साधेपणाचा दाखला द्यायचा झाल्यास ते आपल्याला आमदार म्हणून मिळणाऱ्या अडीचशे रुपयांपैकी बहुतांश पैसे पक्ष कामासाठी देत. त्यांचा आहारही अगदी साधा होता. त्यात डाळ, भात आणि तळलेल्या वांग्यांचा समावेश असायचा. असंही म्हटलं जातं की ज्योती बसु यांनी वयाच्या 21 व्या वर्षी पहिल्यांदा चहा घेतला होता. त्यांच्या स्मृतींना अभिवादन!

ज्योती बसू यांनी 2000 मध्येच सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती, परंतु तरीही ते भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे प्रणेते राहिले.

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’

ज्योती बसू यांच्या जीवनाशी निगडित काही महत्त्वाच्या घटना : 

– 8 जुलै 1914 रोजी कोलकाता येथे जन्म.

– प्रेसिडेन्सी कॉलेजमधून इंग्रजी विषयात नावलौकिक असलेली बॅचलर पदवी. लंडनमधून कायद्याचे शिक्षण घेतले. त्याच वेळी मार्क्सवादाचा ‘काखरा’ शिकून सार्वजनिक जीवनात सामील झाले.

– 1940 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष [ CPI ] मध्ये प्रवेश केला.

– 1944 मध्ये ते बंगाल रेल्वे वर्कर्स युनियनचे पदाधिकारी बनले.

विशेष लेख : मोदी आणि राहुलच्या पलीकडे पण जग आहे मित्रांनो… – चंद्रकांत झटाले

– 1946 मध्ये बंगाल विधानसभेवर निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या हुमायून कबीर यांचा पराभव केला.

– यानंतर 1952, 1957, 1962, 1967, 1969 आणि 1971 मध्ये ते बारानगर विधानसभेतून निवडून आले. याच दरम्यान 1972 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.

– 1964 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPI-M) ची स्थापना झाली. ते त्याच्या संस्थापकांपैकी एक होते.

– 1967 मध्ये ते बंगालच्या आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले.

– 21 जून 1977 रोजी ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले. 6 नोव्हेंबर 2000 पर्यंत ते पश्चिम बंगालच्या डाव्या आघाडी सरकारच्या प्रमुखपदी राहिले.

हेही वाचा ! इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५७० जागा

– 1996 मध्ये ते देशाचे पंतप्रधान बनले असते. परंतु त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च धोरणानुसार बहुमताच्या निर्णयानुसार ते पंतप्रधान होऊ शकले नाही.

– सन 2000 मध्ये, तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडले आणि त्यानंतर सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली.

– 2004 मध्ये, त्यांनी केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारला डाव्या पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामध्ये मोठी भूमिका बजावली.

– 17 जानेवारी 2010 रोजी वयाच्या 95 वर्षी निधन झाले.

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख

लोकप्रिय