Sunday, April 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आळंदीत उबदार ब्लॅंकेटचे वितरण, मानवतेच्या कार्यामुळे दुःख दूर करता येते – प्रीती बोंडे

---Advertisement---

---Advertisement---

पिंपरी चिंचवड : आळंदी येथे लायन्स क्लब पुणे मेट्रोपोलिसचे सर्व सभासद व वुमन एमपॉवरमेन्ट  पिंपरी चिंचवड विभागीय प्रमुख प्रीती बोंडे यांच्या संयुक्त विद्यमानाने आळंदी येथील घाटावरील उपस्थित यात्रेकरूंना व गरजू लोकांना 150 उबदार ब्लँकेट, कपड्यांचे वाटप करण्यात आले.

या वेळी क्लब सदस्य जयंत बोंडे, अनुप ठाकूर, गुलशन पाल, प्रिया पाल, जगमोहन अगरवाल, पार्थ, रिजन चेअरपेरसन, मनोज बन्सल तसेच लायन्स इंटरनॅशनल प्रांत 3234D2 चे वर्ष 2022-23 चे उमेदवार लायन सुनिल जाधव, दीपा जाधव उपस्थित होते.

हेही वाचा ! इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५७० जागा

यावेळी प्रीती बोंडे म्हणाल्या की, आपली संस्कृतीमध्ये मानवता आहे. मानवतेच्या कार्यामुळे दुःख दूर करता येते. आळंदी असे ठिकाण आहे की ज्यांना छत नाही असे बरेच लोक तेथे निवाऱ्यासाठी रात्री येतात. म्हणुन आम्ही सर्वानी ठरवले की थंडी च्या दिवसांमधे ब्लँकेट हे आळंदी मध्ये रात्री वाटप करून एक हात मदतीचा द्यावा. करून घेणारा देव असतो करणारा हा फक्त निमित्त मात्र असतो, असे यांनी त्यांचे  मत  व्यक्त केले.

याच महिन्यात किनारा वृद्धाश्रम कामशेत येथे लागणार्‍या गरजेच्या वस्तू, धान्य, मास्क,बाथसोप, सैनीटायझर, हॅन्ड वॉश, स्पिन मोप, खाद्य पदार्थ इत्यादी देऊन एक हात मदतीचा आम्ही दिला आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

ग्राहकांसाठी खुशखबर ! आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’

हेही वाचा ! ज्योती बसू : पक्ष निर्णयानुसार पंतप्रधान पद नाकारणारे, पश्चिम बंगालचे सलग २३ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नेते

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles