Thursday, March 20, 2025

जुन्नर : पर्यटन स्थळांना पुन्हा ब्रेक, आदेश जारी !

जुन्नर / शिवाजी लोखंडे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळी जिल्हाधिकारी ठिकाणांपासून एक किलोमीटर डॉ.राजेश देशमुख यांनी बंदी हुकूम जारी केला आहे. परिसरात पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. 

या आदेशाची कडक अंमलबजावणी ८ जानेवारीपासून पोलिसांनी सुरू केली आहे. मनोरंजन उद्याने, प्राणिसंग्रहालय, वस्तू संग्रहालये, किल्ले, सशुल्क ठिकाणे आणि कार्यक्रम, स्थानिक पर्यटन स्थळे बंद राहतील, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 

हेही वाचा ! धक्कादायक : जात पाहुन वकिलाला नाकारले घर

त्यानुसार जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे पर्यटनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला, चावंड किल्ला, हडसर किल्ला, आंबे, हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिबटा निवारा केंद्र या ठिकाणी तसेच जिल्ह्यात सर्वत्र जमावबंदी संचारबंदी नियम उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा ! आदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण केल्याचा डॉ. अजित नवले यांचा आरोप, …अन्यथा तीव्र आंदोलन

हेही वाचा ! पुणे : उद्यापासून किसान सभेचे जुन्नर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

हेही वाचा ! NHPC मध्ये परिक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी !

Related Articles

- Advertisement -

Latest Articles