Tuesday, September 17, 2024
Homeराज्यधक्कादायक : जात पाहुन वकिलाला नाकारले घर

धक्कादायक : जात पाहुन वकिलाला नाकारले घर

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. चिखलठाणा येथे जात पाहुन घर नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. एका उच्चभ्रू सोसायटीत घर घेण्यासाठी गेलेल्या वकिलाला जातीचं कारण सांगून घर नाकारलं आहे. 

महेंद्र गंडले असं संबंधित वकिलाचं नाव असुन त्यांनी एका बांधकाम साईटवर जाऊन रो हाऊसची पाहाणी केली त्यांना घर आवडलं. परंतु एका कर्मचाऱ्याने त्यांना जात विचारल्यावर अनुसूचित जातीचे असल्याने ‘तुम्हाला इथे घर देता येणार नाही’ असे सांगण्यात आले. तसेच बिल्डरने देखील जातीचं कारण सांगून त्यांना घर देण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा ! ब्रेकिंग : सर्वच दुकानांच्या नामफलकाबाबत राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित वकिलाने चिखलठाणा पोलीस ठाण्यात बिल्डर आणि त्यांच्या कर्मचाऱ्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

महेंद्र गंडले हे ७ जानेवारी रोजी पत्नी, मुलांसह भाईश्री गुपची भूमी विश्वबन येथील रो हाऊसची साइट बघण्यासाठी गेले होते त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी सहा जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा ! प्राध्यापकांसाठी खुशखबर ! ‘या’ महाविद्यालयातील पदे भरणार, राज्य सरकारचा निर्णय !

हेही वाचा ! आदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण केल्याचा डॉ. अजित नवले यांचा आरोप, …अन्यथा तीव्र आंदोलन

संबंधित लेख

लोकप्रिय