जुन्नर : तालुक्यातील उत्तर आदिवासी भागात मांडवी नदी धोका पातळी ओलाडली असून अनेक गावचा संपर्क तुटला आहे. त्यामध्ये कोपरे, काठेवाडी, माळी वाडी, कुडाळ वाडी या गावचा संपर्क तुटला आहे.
गेल्या चार दिवसांपासून सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे जुन्नर च्या पश्चिम आदिवासी भागातील एकमेव पिक असलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भात खाचरांचे बांध फुटून वाहून गेले आहेत. भात खाचरांचे पंचनामे करुन तात्काळ मदत करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
संपादन – संजय माळी