जुन्नर / आनंद कांबळे : बी. एस. धोत्रे गुरुजी यांच्या ५७ व्या स्मृतिदिनानिमित्त जुन्नर तालुका बौद्धजन संघाच्या नुतनिकृत वसतिगृहांचा व कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
जुन्नर तालुका बौद्धजन संघ, मुंबई (रजि.) विद्यमाने संघाचे संस्थापक अध्यक्ष बी. एस. धोत्रे गुरुजी यांच्या स्मृतींना ५७ वर्षानंतरही त्यांच्या मौलिक कार्याचे कौतुक करून सर्व धोत्रे गुरुजींच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत संघाचे अध्यक्ष के. बी. वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली वाहण्यात आली.
या स्मृिदिनानिमित्त संघाने केलेल्या जिजामाता कन्या छात्रालय, मिलिंद विद्यार्थी वसतिगृह व संघाच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा प्रमुख पाहुणे यशवंत मानखेडकर (उपसंचालक – नेहरु युवा केंद्र भारत सरकार) व डॉ. धनंजय लोखंडे (मा. संचालक विभागप्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमानिमित्त वसतिगृहातील विद्यार्थ्यांना कपडे, वह्या, पेन, घड्याळ, खेळाचे साहित्य दानशूर व्यक्तींकडून भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अॅड. अशोक लोखंडे यांनी केले व आभार संघाचे वसतिगृह चेअरमन शांतूजी डोळस यांनी मानले.
प्रसंगी कार्यक्रमास डॉ. प्रदीप जोशी, डॉ. शिवाजी सोनवणे, डॉ. वल्हवणकर, ज्येष्ठ समाजसेवक संभाजी साळवे, समाजसेवक पोपट सोनवणे, पत्रकार विकास कडलक, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, संघाचे खजिनदार प्रकाश फुलपगार, उपाध्यक्ष मोहन खंडे, उत्तम खरात, रवींद्र साळवे, सहसचिव दिलीप सोनवणे, कैलास भद्रिके, सुहास ठोसर, संस्थेचे अंतर्गत हिशेब तपासनीस विकास डोळस, दिनेश भद्रिके, सदस्य ज्ञानेश्वर गायकवाड, धर्मेंद्र डबडे, रमेश लवांदे, सुमंगल ढेपे, अधिक्षक प्रशांत धोत्रे, रत्नाकर कसबे व कसबे मॅडम उपस्थित होते.