Sunday, December 8, 2024
HomeNewsनवरात्रीत पुण्यात होणारे "सेक्स तंत्र "शिबिर अखेर रद्द ; काय आहे प्रकरण...

नवरात्रीत पुण्यात होणारे “सेक्स तंत्र “शिबिर अखेर रद्द ; काय आहे प्रकरण ?

पुणे : सोशल मीडियावर ‘सेक्स तंत्र’ नावाने नवरात्र विशेष शिबिराची जाहिरात झळकल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली होती.
सामाजिक व राजकीय संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर उत्तर प्रदेशमधील सत्यम शिवम सुंदरम फौंडेशनचे प्रमुख रवी सिंग यांच्याशी यासंदर्भात पोलिसांनी संपर्क साधला. त्यानंतर हे शिबिर आम्ही रद्द करीत असल्याचे फौंडेशनने सांगितले.

‘सेक्स तंत्र’ च्या जाहिरातीमध्ये दि. 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान 3 दिवस 2 रात्र लैंगिक प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविला जाणार असल्याचे नमूद करण्यात आल्याने सर्वत्र याच जाहिरातीची चर्चा रंगली होती. सत्यम शिवम सुंदरम फौंडेशनतर्फे या प्रशिक्षण शिबिराची जाहिरात करण्यात आली होती. जाहिरातील अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी एक क्रमांक देण्यात आला होता. या अभ्यासक्रमासाठी एका व्यक्तीकडून 15 हजार रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच यात वैदिक सेक्स तंत्रासह चक्र अँक्टिव्हेशन, ओशो मेडिएशन सारख्या विविध गोष्टी शिकविल्या जाणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. व्हॉटसपसाठी अ101 असा कोडही देण्यात आला होता. नवरात्र उत्सावाच्या निमित्ताने तरुणांना लैंगिक प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणी सुरू झाली आहे. त्याबाबत सोशल मीडियावर जाहिरातींचा मोठा मारा करण्यात आला. सामाजिक व राजकीय संघटनांनी शिबिराला विरोध दर्शविला आहे.

याविषयी सांगताना सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार म्हणाले, आम्ही इंटरनेटवरून फौंडेशनशी संपर्क साधला. फौंंडेशनच्या प्रमुखांशी बोलणे झाले. या शिबिरासाठी नावनोंदणी झालीच नाही. त्यामुळे जागा निश्चित केलेली नव्हती. बुकिंग झाल्यावर जागा ठरविण्यात येणार होती. त्यात नग्नता काहीच नव्हती असे त्यांचे म्हणणे होते. पण ज्या पद्धतीने जाहिरात झाली ते आक्षेपार्ह आहे असे सांगितल्यावर हे शिबिर त्यांनी रदद
केले.

सोर्स : लोकमत

संबंधित लेख

लोकप्रिय