Junnar : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला लाथा-बुक्क्यांनी व विटेने डोक्यात मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित पतीस पोलिसांनी तात्काळ अटक केल्याची माहिती ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली. Junnar News
देवकाबाई कैलास हिलम (वय, ३३) असे पतीच्या जबरी मारहाणीत खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी कैलास जयराम हीलम (वय ३८, रा. तळेरान बोरीचीवाडी, ता. जुन्नर) असे संशयित पतीचे आहे .
याबाबतची फिर्याद मंगळवारी (दि.९) दादाभाऊ चीमा मुकणे (वय ३५, रा. खिरेश्वर, ता. जुन्नर) यांनी ओतूर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून संशयित पतीला अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मयत पत्नी देवकाबाई कैलास हिलम हिस तिचा पती कैलास जयराम हिलम हा चारित्र्याचा संशय घेऊन मारहाण करीत असे. वसार (ता. अंबरनाथ, जि. ठाणे) व तळेरान बोरीची वाडी येथे कैलासने पत्नीला लाथा-बुक्क्यानी मारहाण करून डोक्यात विट घातल्याने तिचा मृत्यू झाला होता. ही घटना दि. १ ते ७ एप्रिल दरम्यान घडली असून पत्नी देवकाबाईचा सोमवारी (दि. ८) रात्री ८ वाजेदरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे हे करीत आहेत.


हे ही वाचा :
जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या
ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू
माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत
हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना
मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !
ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू