Wednesday, February 19, 2025

जुन्नर : ह.भ.प.सखाराम चाळक यांचे अल्पशाने निधन !

जुन्नर : पिंपळवंडी ( ता. जुन्नर ) येथील सेवानिवृत्त शिक्षक व वारकरी सांप्रदयामधील जेष्ठ व्यक्तीमत्व आणि संत सहादूबाबा गुंजाळवाडीकर व सावळेरामबाबा पिंपळवंडीकर पायी दिंडी सोहळ्याचे संस्थापक ह.भ.प.सखाराम रामभाऊ चाळक ( वय ८९ वर्ष)  यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांनी जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावाजवळ असलेल्या तांबेवाडी येथे विनाअनुदानित शाळा सुरु केली चार वर्ष त्यांनी ही शाळा विनापगारी चालविली त्यानंतर त्या शाळेला जिल्हा परिषदेने मान्यता दिली. सुरवातीपासूनच वारकरी सांप्रदयात ते रमले सकाळी देवपूजा व सायंकाळी हरीपाठ हा कधीच चुकला नाही.

हेही वाचा ! पुरोगामी चळवळीवर शोककळा ! ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी .पाटील यांचे निधन

चाळकवाडी येथे सन मध्ये ह.भ.प.बजाभाऊबाबा सोनवणे यांनी महाशिवरात्र मोहत्सवात अखंड हरीनाम सप्ताहाची सुरवात केली. त्यानंतर बजाभाऊबाबांचे निधन झाले आणि त्यानंतर अखंड हरीनाम सप्ताहाची धुरा चाळक गुरुजी यांच्याकडे आली व अनेक वर्ष स्वतः पदरमोड करुन हा सप्ताह पुढे सुरु ठेवला. त्यानंतर त्यांनी एकवीस वर्षांपूर्वी ह.भ.प.रामभाऊ बुआ वामन चिमाजीबुआ काचळे या सहक-यांना बरोबर घेऊन संत सहादूबाबा वायकर व संत सावळेरामबाबा पिंपळवंडीकर पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याची सुरवात केली.

चाळक गुरुजी यांचा स्वभाव करारी होता. ते स्वतः शिस्तीचे पालक असल्यामुळे पायी दिंडीत जाणाऱ्या वारक-यांनाही शिस्त लावण्याचे काम केले. त्यांचा करारी बाण्यामुळे असल्यामुळे वारकरी सांप्रदयात त्यांचा मोठा मित्रपरीवार आहे. त्यांच्या निधनामुळे वारकरी सांप्रदयावर शोककळा पसरली आहे.  त्याच्या मागे चार मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा ! जुन्नर : पिंपळवंडीमधील पायमोडे दांपत्य राज्यस्तरीय ‘आदर्श माता-पिता’ पुरस्काराने सन्मानित

नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे प्रकल्पाचे सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी व कवी शिवाजीराव चाळक, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यलक्षी संचालक बाळकृष्ण चाळक शिवनेरवार्ताचे संपादक व पत्रकार विजय चाळक व प्रगतशिल शेतकरी महेंद्र चाळक यांचे ते वडील होते.

नोकरीची संधी नवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी ! 

हेही वाचा ! ओडिशात आदिवासींवर कंपनी – सरकार चे जुलमी राज्य – डॉ. संजय दाभाडे


Related Articles

- Advertisement -

Latest Articles