Wednesday, December 4, 2024
Homeजुन्नरजुन्नर : नाणेघाटात साहसी खेळ भरवणं पडलं महागात, वन विभागाने ठोठावला दंड

जुन्नर : नाणेघाटात साहसी खेळ भरवणं पडलं महागात, वन विभागाने ठोठावला दंड

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले जीवधन व नाणेघाट येथे साहसी खेळ भरवणं ‘सह्याद्री रोवर्स व सह्यगिरी अॅडव्हेंचर’ या संस्थांना चांगलंच महागात पडलं आहे. या संस्थांना वनविभागाने दंड ठोठावला आहे.

मुरबाड जि.ठाणे येथील या संस्थानी वनपरिक्षेत्रामध्ये कोणतीही परवानगी न घेता अँडव्हेंचर अँक्टीव्हीटी घेतल्याने प्रत्येकी दोन हजार पाचशे रुपयांचा चा दंड केला आहे. घाटघरचे वनरक्षकांचा अहवाल तसेच ओम आदिवासी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मडके यांनी दिलेल्या अर्जानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी दिली.

जुन्नर : ग्रामपंचायत निमगिरी येथे मनरेगा अंतर्गत नाला बांध बंधीस्तीच्या कामाला सुरुवात

या संस्थांकडून ६ मार्च रोजी साहसी खेळाचे आयोजन केले होते. मात्र त्यासाठी किमान दहा दिवस अगोदर या कार्यालयास अर्ज सादर करणे आवश्यक होते. तसेच यासाठी कार्यालयाची परवानगी न घेता अँडव्हेंचर अँक्टीव्हीटी घेतली असल्याचे स्पष्ट झाल्याने दंडाची कारवाई करण्यात आली असून घाटघर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडे दंडाची रक्कम जमा करावी असे लेखीपत्र त्यांना देण्यात असले आहे.

यापुढे विनापरवाना साहसी खेळाचे आयोजन केल्याचे आढळून आल्यास भारतीय वनअधिनियम १९२७ अन्वये अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे अजित शिंदे यांनी सांगितले. 

आदिवासींसाठी विशेष पदभरती मोहीम, अधिसंख्य कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारचा ‘हा’ निर्णय

साहसी खेळ (Adventure Activities) घेणाऱ्या संस्थांनी किमान दहा दिवस अगोदर अर्ज सादर करून याबाबतची पूर्वपरवानगी घेऊन नंतर अशा कार्यक्रमाचे आयोजन करावे. अर्जासोबत पर्यटन व सांस्कृतीक कार्यविभाग यांचेकडील नोंदणी पत्रक व समन्वयकांचे साहसी खेळाचेचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असणार आहे.

तलाठ्यांनो सावधान ! ..अन्यथा घरभाडे बंद करणार


संबंधित लेख

लोकप्रिय