जुन्नर (पुणे) : सचिनभाऊ चव्हाण मित्र परिवार यांच्या वतीने माय ऍक्टिव्हिटी सेंटर संचालित नंदनवन संस्था खानापूर येथे दिनांक २० जुलै रोजी दिव्यांग बांधवांसोबत अँड.सचिन चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी दिव्यांग बांधवाना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच राजू डुंबरे यांच्यावतीने पाच हजार रुपये रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली.
समाजातील दानशूर व्यक्तींनी या संस्थेला मदत करावी. तसेच स्वतःचा किंवा मित्र, नातेवाईक यांचा दिव्यांग बांधवांसोबत वाढदिवस साजरा करून वस्तू स्वरूपात तसेच आर्थिक स्वरूपात मदत करावी असे आवहान देखील करण्यात आले.
यावेळी दत्तात्रय गवारी, बंडू उतळे, संदीप कोल्हाळ, राजूशेठ डुंबरे, महेश कोल्हाळ, संतोष शिंदे, अशोक बोचरे, दिपक रघतवान, अंकुश बांडे, विश्वास बुळे व मित्रपरिवार उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संस्थापक विकास घोगरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.