Friday, December 27, 2024
Homeग्रामीणजुन्नर : आ. बेनके यांनी केली पश्चिम आदिवासी भागाची पहाणी !

जुन्नर : आ. बेनके यांनी केली पश्चिम आदिवासी भागाची पहाणी !

जुन्नर : गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे, तसेच जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातही जोरदार पाऊस पडतो आहे, या सतत पडणाऱ्या पावसामुळे आदिवासी भागातील फांगुळगव्हाण गावामध्ये भात खाचरांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज (२३) आमदार अतुल बेनके यांनी भेट दिली. 

तसेच, फांगुळगव्हाण येथील इतर गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. या पार्श्वभूमीवर सदर पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधण्याचे आश्वासन आमदार बेनके यांनी येथील नागरिकांना दिला. 

सध्या राज्यातील कोकण भागात सातत्याने पडणारा पाऊस चिंताजनक परिस्थिती निर्माण करत असताना जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन याप्रसंगी आमदार बेनके यांनी केले. 

यावेळी जि. प.सदस्य देवराम लांडे, भाऊसाहेब देवाडे, अमोल लांडे, मारुती वायाळ, काळू शेळकंदे, निलेश रावते, देवका मोरे, अजिंक्य घोलप, पांडुरंग उतळे आदी मान्यवर व शेतकरी बांधव उपस्थित होते.

अधिक वाचा : 

जुन्नर : तालुक्यात आज आढळले ६३ कोरोनाचे रुग्ण

संबंधित लेख

लोकप्रिय