Junnar / नवनाथ मोरे : तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खटकाळे, या शाळेने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
पंचायत समिती जुन्नर, द हंस फाउंडेशन आणि शिक्षणा फाउंडेशन यांच्या सयूंक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय उमंग प्रश्नमंजुषा २०२४ स्पर्धा, आदिवासी सांस्कृतिक भवन, जुन्नर (Junnar) येथे पार पडली. त्यात प्रत्येक केंद्र स्तरावरील विजेते असे एकूण नऊ केंद्रात महाअंतिम फेरी तालुका स्तरावर पार पडली.
या प्रश्नमंजुषा स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खटकाळे शाळेने तृतीय क्रमांक संपादित केला. या स्पर्धेत सार्थक बाळू भवारी, विराट संतोष मोडक, जिया जाफर इनामदार, प्रियंका बाळू भवारी यांनी सहभाग घेतला. तसेच विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून शासकीय आश्रमशाळा खटकाळे या शाळेचा पुरस्कार शाळा प्रतिनिधी शिक्षक प्रवीण गाढवे यांनी स्वीकारला.
विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक यु. एच. भोसले, शिक्षक दिलीप लोंढे, सोमा मुंढे, बाबुराव आंबवणे, योगेश गवारी, ज्ञानेश्वर भालेकर, सचिन थोरात, प्रविण गाढवे, शिक्षणा फाउंडेशनचे मुकुंद घोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक उत्तम भोसले सर्व शिक्षक, अधिक्षक, अधिक्षिका, वर्ग चार कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास झाडे यांनीही विजेत्या मुलांचे कौतुक केले.
हे ही वाचा :
निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी
मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक
समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू
मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर
मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार
मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर
वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान
मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान