Monday, December 23, 2024
Homeग्रामीणजुन्नर : खिरेश्वर येथील तरुणांनी अनोख्या पध्दतीने साजरी केली संत गाडगेबाबांची पुण्यतिथी

जुन्नर : खिरेश्वर येथील तरुणांनी अनोख्या पध्दतीने साजरी केली संत गाडगेबाबांची पुण्यतिथी

जुन्नर (पुणे)  : जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर गावातील तरुणांनी आज अनोख्या पध्दतीने संत गाडगेबाबांंची पुण्यतिथी साजरी केली. 

आज राष्ट्रसंत स्वच्छत्तेचे प्रणेते संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राजा हरिश्चंद्र बहुउद्देशिय सामाजिक प्रतिष्ठान, खिरेश्वर  व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने खिरेश्वर भागातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या स्थळांपैकी मोडके देऊळ (शिवमंदिर) व मंदिराजवळील पिंपळगाव जोगा धरणाचा किनारा या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. मात्र सोबत आणणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने त्या ठिकाणी मोठया प्रमाणात कचरा साचलेला होता. त्यामुळे आज संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज तरुणांनी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेमध्ये राहुल कोरडे, नितीन मेमाणे, रविंद्र भौरले, आदित्य कवटे, अमोल कोरडे, बाळू रेंगडे, संजय कोरडे, दीपक मेमाणे, विजय मेमाणे, संजय मेमाणे, मारुती रेगंडे आदींंनी सहभाग घेतला. दरम्यान, या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले.

संबंधित लेख

लोकप्रिय