सोशल मीडियावर सतत वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ फारच मजेदार असतात तर काही व्हिडीओ चकीत करणारे असतात. असे व्हिडीओ लोक शेअर करतात.मनोरंजन करणारे हे व्हिडीओ खूप पसंतही केले जातात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जॉनी जॉनी…ही कविता तर सगळेच शिकले आहेत. आता तर तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या तोंडूनही दिवसातून कितीवेळा ती ऐकत असाल. लहान मुलेही आवडीने हव्या तेवढ्या वेळ सेम चालीमध्ये ही कविता ऐकवतात. सध्या याच जॉनी जॉनी कवितेचं एक वेगळं व्हर्जन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. जे फारच मजेदार आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, जॉनी-जॉनीचं क्लासिकल व्हर्जन आहे. एक व्यक्ती जॉनी जॉनी सुरेल आवाज गात आहे तर वाद्यवृंद त्याना साथ देत आहेत. एकजण तबला वाजवत आहे तर एकजण हार्मोनियम वाजवत आहे. दोन जण मागे बसले आहेत. व्हायरल झालेला हा व्हिडीओ बघून सगळेच लोक अवाक् झाले आहेत. कारण त्यांनी या कवितेचं असं व्हर्जन ऐकायला मिळालं नाही. जे फारच मजेदार आणि चांगलं वाटत आहे. लोक गायकाचं भरभरून कौतुक करत आहेत.