कविता –
सांगा मी जगु कसं?
ह्या Corona मुळे माझ्या जीवनाचं झालं हसं,
माझ्या मुखात जाईना भाकरीचा घास.
अन् श्वासात येईना श्वास,
सांगा मी जगु कसं?
आनंदानं जगायचं म्हणून मी धरली होती आशा,
आता या Coronaला काय सांगू माझी दशा,
माझ्या मुखातून येईना कुठलीच भाषा.
आता माझ्या नशिबी आहे, फक्त निराशा फक्त निराशा….
आता मला आरशात बघून माझं
येतयं हसं,
सांगा मी जगु कसं?
खरंतर गरिबाचं दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये असं वाटतय,
माझं दुःख माझ्या मनात साठतयं.
मी आनंदाने जगतो याचा होतो भास,
पण हीच आहे माझ्या खऱ्या आयुष्याची रास.
हा Corona कसा कधी जाईल याचाच विचार करतोय मी तासनतास,
सांगा मी जगु कसं?
आता नाही कुणाचा मला आधार,
माझ्या डोक्यावर आहे संसाराचा भार.
अगदी जवळच्यानीही बंद केले दार,
ह्या Corona ने मला न मारताच केलयं ठार.
कोणाजवळ जाईना त्यो माणुस मी कसं,
सांगा मी जगू कसं?
किरण शिवाजी जावीर
दत्तनगर,वासुद रोड, सांगोला
मो.नं : 8623981056
ईमेल : Kiranjaveer34@Gmail.com