कविता : संघर्षयोद्धा – आबासाहेब – तुषार गुळीग
सदा दुष्काळ जणू काही
आमच्या पाचवीला पुजलेला..
फुलवले नंदनवन माळावरती
लाल सलाम त्यांच्या संघर्षाला…
सांगोला आमचं आहे
बोरं, डाळिंबाचं आगार..
जणू आहे त्याला काही
इथल्याचं मातीचा आधार….
नाही मनी मोह कशाचा
ना अपेक्षा करतात कशाची
धुरा घेतली खांद्यावरती
सदा अखंड जनसेवेची..
लोकं दाखवितात प्रेम सदा
त्यांच्या हक्काच्या मतांनी..
झाले अकरा वेळा खा विजयी
रचला इतिहास आबांनी..
रात्र-दिवस लढता तुम्ही
दिनदुबळ्यांच्या हक्कासाठी
नाही पुरणार शब्द आता
तुमचं गुणगान गाण्यासाठी…
आपला माणूस हक्काचा
नेता अच्छा है सबसे…
जनता म्हणते पुन्हा सारी
कहो दिलसे आबासाहेब फिरसे…
– तुषार पोपट गुळीग
– 7219728293
– गाव-गौडवाडी, ता. सांगोला