यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महाराष्ट्र आणि देशाच्या पायाभरणीचा काळात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक या साऱ्याच अंगांनी नव्या राष्ट्राची पायाभरणी सुरू असताना राज्याची अस्मिता जपून नवे आर्थिक स्त्रोत तयार करून सामाजातील प्रवाहाबहेरील वर्गांना नव्या रचनेत समान संधी देऊन सत्तेचे विकेंद्रीकरण करून महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचे काम पाहिले आदर्श मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फेअभिवादन करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना राबवत असताना अविकसित भागांचा, गावांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घातली पाहिजे कामगारांना काम तर मिळालेच पाहिजे मात्र कामगार हे शहरांकडे धाव घेतात त्यांचा लोंढा कसा थोपविता येईल असा त्यांचा आग्रह होता. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्वाचे आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक तसेच आर्थिक विकासाच्या मास्टर प्लानच त्यांनी प्रत्यक्षात आणला महाराष्ट्रासह पिंपरी चिंचवड सह पुण्यात औद्योगिकीकरणाचा पट्टा विकसित होणे हा त्याचाच एक भाग आहे. यशवंतरावांचे बविचार व तशीच कार्यकुशलता पुढील काळात शरदचंद्र पवार यांनी आजही जपली आहे .
यावेळी कामगार नेते काशिनाथ,किरण साडेकर,उमेश डोर्ले, चंद्रकांत कुंभार, बालाजी बिरादार,ज्ञानेश्वर गायकवाड,अश्विनी आळसे, अर्चना कांबळे,सुमन सकाटे,बायजाबाई सोनसळे, विजया माने आदी उपस्थित होते.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2022/08/IMG_20220807_111017.png)