Home नोकरी Teacher Recruitment : राज्यात आणखी २० हजार शिक्षकांची भरती लवकरच…

Teacher Recruitment : राज्यात आणखी २० हजार शिक्षकांची भरती लवकरच…

Teacher Recruitment : राज्यात आणखी २० हजार शिक्षकांची भरती लवकरच..Teacher Recruitment of 20 thousand more teachers in the state soon

मुंबई : शिक्षण खात्याने आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच शिक्षक भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार असून डीएड आणि बीएड् धारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. Teacher Recruitment

मागील काही दिवसांपूर्वी राज्यात १३,५०० शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत अनेक शिक्षकांना नियुक्तीपत्र दिले आहे. त्यानुसार विविध शाळांमध्ये शिक्षक दाखल होत आहेत, तरीही सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरवर्षी शिक्षक भरती होत नसल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही शहरातील पाच अनुदानित डीएड महाविद्यालयांत सरकारी कोट्यातील जागा भरण्यात अडचण येत आहे. यामुळे दरवर्षी शिक्षक भरती झाल्यास डीएड महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे सांगितले जात आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त दै.लोकसत्ता ने दिले आहे.

Exit mobile version