Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडउद्योग व्यवसायाचे नुकसान होईल, शहरात भारनियमन करू नका - मधुकर बच्चे

उद्योग व्यवसायाचे नुकसान होईल, शहरात भारनियमन करू नका – मधुकर बच्चे

पिंपरी चिंचवड :  सध्या पिंपरी चिंचवड शहरात भारनियमन होणार व तेही ६ ते ७ तास होणार असे काही मेसेज फिरत आहेत त्यात काही जबाबदार प्रतिष्ठित व्यक्तींनी ही मेसेज केल्यामुळे नागरिक संभ्रम अवस्थेत व नाहक भीतीत आहेत.

पिंपरी चिंचवड  हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते अनेक छोटे मोठे व्यवसायिक मोठ्या प्रमाणात आहेत मोठा इडस्ट्रीयल भाग म्हणून ख्याती आहे शहरात आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत त्यांची कामे घरीच म्हणजे (work from home )कामे मोठ्या संख्येने आहेत अश्या शहरात भारनियमन नाहीच झाले पाहिजे त्याला जनतेचा तीव्र विरोध आहे.

महापालिकेला मिळालेला पुरस्कार हा राष्ट्रवादीसाठी ‘आरसा’ – माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची टीका

पिंपरी चिंचवड शहरात भारनियमन करू नये. शहरातील वास्तव शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महावीतरणच्या वरिष्ठांना योग्य रित्या समजून सांगावे म्हणून महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी पिंपरी कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, भोसरी कार्यकारी आभियंता भोसले, डेप्युटी इंजिनियर आर.दराडे यांच्याशी चर्चा केली व भारनियमन करू नये असे निवेदन दिले.

आपल्या शहरात एवढ्यात भारनियमन होण्याची शक्यता नाही, त्यात काही नियम आहेत. त्यानुसार भारनियमन शेड्युल बनते वरिष्ठ आदेश आल्यानंतर तशी जाहीर कल्पना नागरिकांना दिली जाईल. व आपल्या शहरात भारनियमन होणार नाही यासाठी  पिंपरी चिंचवड महावितरण विभागाकडून पूर्ण प्रयत्न केले जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे मधुकर बच्चे म्हणाले.

LIC Policy : एलआयसीच्या ‘या’ प्लानमध्ये केवळ 73 रुपये जमा केल्यावर मिळतील 10 लाख रुपये

तसेच लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. महावितरण संबंधीत अधिकारी किंवा आपल्या बिलावरील टोल फ्री नंबरवर माहिती घ्यावी असे आवाहन मधुकर बच्चे व महावितरण अधिकारी यांनी जनतेला असे आवाहन केले आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय