नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दलाने अंदमान समुद्रातील ‘सर्वात मोठा अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. भारतीय तटरक्षक दलाने म्यानमारच्या एक मच्छिमारी बोटीला अडवून तिच्या ताब्यातून ५,५०० किलो मॅथाम्फेटामिन ड्रग्ज जप्त केले. (Indian coast guard)
ही घटना २४ नोव्हेंबर रोजी घडली. भारतीय तटरक्षक दलाच्या डॉर्नियर विमानाने संशयास्पद मच्छिमारी बोट ‘सोे वाई यान थू’ ची गुप्तचर पाहणी करत असताना दिसली. त्यानंतर तटरक्षक दलाच्या जॉइंट ऑपरेशन सेंटरने (JOC) एका तटरक्षक जहाजाला पाठवून मासेमारी बोटीस अडवले.
ही कारवाई बोटला बॅरेन बेटांच्या जवळ भारतीय जलक्षेत्रात करण्यात आली, आणि त्यावर असलेल्या सहा म्यानमारच्या सदस्यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी बोटीवरून मॅथाम्फेटामिन ड्रग्ज आणि एक पोर्टेबल सॅटेलाइट फोन सापडले. (Indian coast guard)
तटरक्षक दलाने सांगितले की, अंदमान समुद्रात रोहिंग्या बोट्स आणि म्यानमारच्या शिकाऱ्यांच्या सक्रियतेत वाढ झाली आहे. तटरक्षक दलाची अमली पदार्थांच्या संदर्भातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. मासेमारीच्या नौकेत हे अमली पदार्थ सापडले.
तटरक्षक दलाने जप्त केलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा साठा आहे. तटरक्षक दलाच्या ड्रोनियर २२८ हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बोटीचा समुद्रात शोध घेण्यात आला.