प्रतिनिधी :- लडाखमध्ये भारत आणि चीनमधील बराच काळ सुरू असलेला वाद आणखीनच वाढला आहे. सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यात एक हिंसक झुंज झाली. या चकमकीत भारतीय लष्कराचे एक अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झाले आहेत. सोमवारी रात्री गलवान घाटीजवळ दोन देशांमधील चर्चेनंतर सर्व काही पूर्वस्थितीवर येत असताना ही घटना घडली.
असे म्हटले जात आहे की, केवळ काही भारतीय सैनिकांनाच नव्हे तर चीनच्या ही सैनिकांना दुखापत झाली आहे. या चकमकीदरम्यान कोणत्याही प्रकारची गोळीबार झालेले नाही असे सांगण्यात येत आहे. या चकमकीत चिनी लष्कराचेही नुकसान झाले आहे. चीनच्या ५ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, चिनी माध्यम ग्लोबल टाईम्सने यांस नकार दिला आहे.
यावेळी हा विषय शांत करण्यासाठी दोन्ही देशांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी बैठक घेत आहेत.