Thursday, December 26, 2024
Homeराज्यखावटी अनुदानाचे उद्घाटन, आ. विनोद निकोले यांच्या मागणीला यश

खावटी अनुदानाचे उद्घाटन, आ. विनोद निकोले यांच्या मागणीला यश

डहाणू : खावटी अनुदानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणाली द्वारे उद्घाटन करण्यात असल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा कॉम्रेड विनोद निकोले यांच्या मागणी यश असल्याचेे म्हटले आहे.

यावेळी आमदार निकोले म्हणाले की, गेले वर्षभर कोरोना महामारीने राज्यात थैमान घातले आहे. त्यामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे तर जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यात ऐन भाताच्या मोसमात पडलेल्या अकाली अतिवृष्टीने वर्षभर केवळ हे एकच पीक घेणाऱ्या आदिवासींना जगणेच कठीण झाले. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आदिवासी कुटुंबांना चार हजार रुपये (दोन हजार रुपये थेट बँक खात्यात आणि दोन हजार रुपये धान्य स्वरूपात) खावटी अनुदान देण्याबाबत निकषांची फार चाळणी न लावता सर्व गरजू आदिवासी कुटुंबांना द्यावे असे आम्ही दि. १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठवून मागणी केली होती. 

त्यावर मुख्यमंत्री सचिवालय व उप मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्यवाही साठी “आदिवासी विभागाकडे” पाठविण्यात आले आहे असे कळविले होते. त्यावर, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आदिवासी जमाती सर्वात जास्त प्रभावित झाली आहे. अश्या परिस्थितीत त्यांना खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळावा, कोणतेही पात्र लाभार्थी कुटुंब वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, याबाबत दि. २४ एप्रिल रोजी आदिवासी विकास मंत्री यांनी विभागातील सचिव, आयुक्त, अप्पर आयुक्त, सर्व प्रकल्प अधिकारी यांची बैठक घेतली. तसेच आमच्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने ठाणे-पालघर, नाशिक, रायगड इत्यादी जिल्ह्यांत प्रशासनाला सहकार्य करीत घरोघरी जाऊन योग्य कागदपत्रांची पूर्तता करीत हे खावटीचे अर्ज प्रत्येक कुटुंबाकडून भरून घेत प्रकल्प अधिकाऱ्यांना सुपूर्त केले. हेतू हाच की हे अनुदान त्वरित मिळावे.

या सर्व पाश्वभूमीवर दि. ०१ मे, महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते दूरदृश्यप्रणाली द्वारे खावटी अनुदानाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पालघर जिल्ह्यातील आदिवासी बंधू – भगिनींचा विशेष उल्लेख केला. याप्रसंगी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ, अनुप यादव यांच्या सह सर्व आदिवासी आमदार, डहाणू विधानसभा आमदार कॉमेड विनोद निकोले, पदाधिकारी, अधिकारी, सर्व प्रकल्प अधिकारी अधिकारी, डहाणू प्रकल्प अधिकारी अमिसा मित्तल हे उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय