Thursday, December 5, 2024
Homeराज्यराज्यसभा निवडणुकीत माकपचे आमदार विनोद निकोले करणार ‘या’ पक्षाला मतदान, फडणवीसांचाही आला...

राज्यसभा निवडणुकीत माकपचे आमदार विनोद निकोले करणार ‘या’ पक्षाला मतदान, फडणवीसांचाही आला होता फोन

मुंबई : महाराष्ट्रात सध्या राज्यसभा निवडणुकीवरून वातावरण तापले असून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणूकीत एकेका मताची गरज असल्याने भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याच दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले हे शिवसेनेच्या बाजूने घेतले आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीला अवघे तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत. दोन्ही पक्षातील वरिष्ठांकडून छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना फोन केले जात आहेत. तसेच त्याची भेटही घेतली जात आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या पक्षातील उमेदवाराला पाठींबा देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांना फोन केला होता, मात्र आपण पक्षाच्या निर्णयानुसार शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे फडणवीसांना सांगितले.

आमदार विनोद निकोले हे राज्यातील सर्वात गरीब आमदार आहेत. निकोले यांनी पालघरमधील डहाणू मतदारसंघामधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढून भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यांची एकूण संपत्ती ५१ हजार ८२ रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे निकोलेंच्या नावावर स्वत:चे घरही नाही. ते डहाणूमधील वाकी येथे भाड्याच्या घरामध्ये राहतात.

विशेष लेख : कॉ. कृष्णा देसाई हत्या…शिवसेना अशी वाढली : सुबोध मोरे यांचा सणसणीत लेख

बीडीडी चाळ नामकरणाविरोधात वरळीत तीव्र निदर्शने, कार्यकर्ते ताब्यात

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख

लोकप्रिय