पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : आर्थिक गुन्हेगारी करणाऱ्यांचा भांडाफोड केल्यामुळे आकासापोटी माजी सनदी अधिकाऱ्यावर कटकारस्थान करून खोटी ॲट्रॉसिटी दाखल करणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संथापक नेते भगवानराव वैराट यांनी दिला आहे . वैराट म्हणाले की ,आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे विविध सामाजिक चळवळीतले प्रमुख संघटनेच्या वतीने आपणास नम्र विनंती करीत आहोत की, सदरील सनदी अधिकारी हे अतिशय कर्तव्यदक्ष अण्णी सामाजिक कार्य करणारे आहे शिवाय त्यांनी जाती-जमातीच्या घटकांसाठी अतिशय कर्तबगारीने आणि समतोल राखून विविध योजनेचा लाभ घेऊन न्याय दिला आहे .त्यामुळे सामाजिक भूमिकेत आम्ही त्यांना चळवळीच्या माध्यमातून पाहत आलेलो आहे.
ते पुरोगामी विचाराचे असून जातिभेद किंवा विषमता हे त्यांच्या प्रशासकीय कामकाज करताना कधीच आमच्या चळवळीला जाणवले नाही. त्यामुळेच आम्ही त्यांच्या पाठीचे खंबीरपणे उभे आहोत. सोलापूर जिल्ह्यातील आर्थिक गुन्हा करून आदिवासी समाजाच्या तरुणाच्या बनावट सह्या करून करोडो रुपये हडप करण्याच्या वृत्तीच्या विरोधात यांनी त्या आदिवासी तरुणाच्या बाजूने उभा राहिल्याने आर्थिक गुन्हेगारी करणाऱ्या टोळीतील आरोपींनी कटकारस्थान करून ५ महिन्यानंतर ह्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
सदरचा गुन्हा सोलापूर शहरात सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला. परंतू पुण्यात घटना घडल्याने सोलापूर पोलीस आयुक्ताने ० नंबर ने मा.पोलीस निरीक्षक चतु:र्शिंगी पोलीस स्टेशन कडे एफ. आय. आर पाठवण्यात आलेली आहे. कृपया पारदर्शक तपास करून योग्य न्याय देऊन खोटी ॲट्रॉसिटी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.असे निवेदनातून सांगितले आहे. माननीय पोलीस आयुक्त कार्यालय येथे मागण्यांचे निवेदन देत असताना रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे प.महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक गायकवाड , झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक भगवानराव वैराट , दलित कोब्राचे संस्थापक अध्यक्ष भाई विवेक चव्हाण ,रिपब्लिकन युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल डंबाळे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रदेश उपाध्यक्ष असित गांगुर्डे ,रिपब्लीकन पारधी आघाडी पुणे शहर अध्यक्ष पुरुषोत्तम पवार ,अतुल बनसोडे ,मंगेश सोनवणे यासह पुणे शहरातील विविध पक्ष संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .
चिखली जाधववाडी येथे येथील धोकादायक उताराचा रस्ता सुरक्षित करा – रोहन चव्हाण
नितेश राणे यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा, तृतीयपंथीचे पुण्यात आंदोलन
जागतिक लोकसंख्यादिनी सुखी जोडप्यांचा सन्मान

