Wednesday, January 15, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमहापालिकेची जागा नसताना कृष्णानगर ला बेकायदेशीर हॉकर झोन, दमदाटी करत असल्याचा आरोप;...

महापालिकेची जागा नसताना कृष्णानगर ला बेकायदेशीर हॉकर झोन, दमदाटी करत असल्याचा आरोप; फेरीवाले करणार आंदोलन

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून कृष्णानगर येथे रिंग रेल्वेसाठी प्रस्तावित असलेल्या पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेमध्ये हॉकर्स झोंन ची प्रक्रिया करण्यात येत आहे. यामध्ये बोगस लाभार्थी घुसवुन जे व्यवसाय करत नाहीत अशा लोकांना त्या ठिकाणी बसवण्याचा घाट पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या  ‘फ’ प्रभागातून करण्यात येत आहे, याला फेरीवाल्यानी प्रखर विरोध केला आहे.

कष्टकरी संघर्ष महासंघ, नॅशनल हॉकर फेडरेशन तर्फे आज कृष्णानगर येथे दोन दिवसापासुन दमदाटी करत असल्याचा आरोप फेरीवाल्यांनी केला आहे. त्यासंदर्भात फेरीवाल्यांची बैठक पार पडली.

व्हिडिओ : हायस्पीड रेल्वे समोर मुलाने घेतली उडी, जीवाची पर्वा न करता पोलिसांने वाचवला जीव

याप्रसंगी कामगार नेते काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, प्रभाग अध्यक्ष मधुकर वाघ,  राजु खंडागले, दीपक साळुंखे, भाग्यश्री भोसले, लक्ष्मण ठोंबरे, सुग्रीव नरवटे, प्रवीण लोंढे, बाबुराव कस्तुरे, इरफान मुल्ला, पांडुरंग शेळवणे, दादा भानवसे, वीरेंद्र गुप्ता, इस्माईल बागवान, अजित वाडेकर आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेकडून शहर फेरीवाला समितीच्या मान्यतेनुसार जागांच्या अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे. मात्र फ क्षेत्रीय अधिकारी हे फेरीवाल्यांना अंधारात ठेवून महापालिकेची जागा नसताना दुसऱ्याच्या जागेमध्ये जा म्हणून सांगण्यात येत आहे, सदरचा रस्त्यामध्ये काही दिवसातच हा रस्ता विकसित होईल त्या वेळेला तिथून फेरीवाल्यांना हाकलून दिले जाईल. याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे, तसेच ज्यांच्याकडे फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्र आहे त्यांचेवर कारवाईस उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असे असताना सुद्धा चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरपणे हॉकर्स झोन ला आमचा विरोध असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.

आमदार महेश लांडगे यांचे विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन

बिराजदार म्हणाले, “फेरीवाल्यांनी एकजूट दाखवावी हॉकर्स च्या जागेसाठी आणि योग्य नियोजनासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र त्याला आधार कायद्याचा असावा, असं अधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. अधिकारी बदलले की पॉलिसी बदलते त्यामुळे कायमस्वरूपी जागा मिळणे गरजेचे आहे, यासाठी आम्ही तीव्र लढा उभारू.”

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख

लोकप्रिय