Friday, December 27, 2024
Homeराज्यआदिवासींंच्या जमिनीवर बेकायदा अतिक्रमण; राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंचाचे धरणे आंदोलन

आदिवासींंच्या जमिनीवर बेकायदा अतिक्रमण; राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंचाचे धरणे आंदोलन


माहूर (नांदेड) : आदिवासींच्या जमिनीवर बेकायदा अतिक्रम करून भूमाफियांनी ग्रामपंचायत हद्दीतील शेतजमिनीवर केलेले बेकायदेशीर लेआउट रद्द करा या मागणीसाठी सारखणी ग्राम पंचायत समोर आदिवासी अधिकारी राष्ट्रीय मंच व आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलनास दिनांक 1 जानेवारी पासून सुरुवात झाली असून कडाक्याच्या थंडीत धरणे आंदोलनाचा चौथा दिवस असून प्रशासनाकडून आदिवासींच्या न्याय हक्काच्या आंदोलनाला बेदखल करण्यात आल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कॉम्रेड शंकर यांनी दिला आहे .

आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचार रोकण्यासाठी व सारखाणी गावाचा विकास करण्यासाठी आदिवासी राष्ट्रीय मंच व आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने सारखणी येथील गट नंबर 20-21-22-64-65 व 82 मध्ये आदिवासींच्या जमिनीवर केलेले लेआउट व गैर आदिवासी चे नावे केलेल्या बोगस मालकी हक्क व नमुना नंबर 8 वर घेतलेल्या नोंदी तात्काळ रद्द करा आणि सिताराम रामजी कुडमते ( डोणीकर ) यांच्या शांततापूर्ण ताब्यात असलेली शेत जमिनीवर 11 फेब्रुवारी 2020 रोजी केलेले अतिक्रम तात्काळ हटवा व अतिक्रम धारकांवर गुन्हे दाखल करा आणि शबरी आदिवासी घरकुल योजना व रमाई आवास योजना पंतप्रधान आवास योजना आधी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून सर्व गोरगरिबांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ सुरु करा व मागेल त्याला काम द्यावा व कामाचे कामाचे योगदान द्या दारिद्र्य रेषा खालील विधवा व 65 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना निराधार योजनेचा लाभ द्यावा, आदी मागण्यासाठी नववर्षाच्या प्रथम दिनी 1 जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात याच मागणीसाठी हजारो आदिवासी बांधवांनी उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय किनवट समोर महामुक्काम आंदोलन केले असता सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी लेखी आश्वासन देऊन आदिवासींच्या जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात येईल असे सांगितले होते. त्यानंतर महामुक्काम आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. परंतु एक महिन्यापेक्षा अधिक काळ लोटूनही कुठलीच कार्यवाही ही प्रशासनाकडून झाली नसल्याने सारखणी ग्रामपंचायत समोर आदिवासी संघटनांनी आपल्या न्याय हक्कासाठी पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे .

…अन्यथा तीव्र आंदोलन करणार – कॉम्रेड शंकर सिडाम

अधिकारी व कर्मचाऱ्यांना भूमी माफियांनी हाताशी धरून सर्व नियम धाब्यावर पायदळी तुडवत गावठाण प्रमाणपत्र आधारे दस्त नोंदणी करून प्लॉटिंग विक्रीचे सारखानी येथे जमीन घोटाळे झाले आहे. आदिवासींची जमिन कवडीमोल दराने विकत घेऊन कुठलीही परवानगी न घेता अवैधरित्या जमिनीवर प्लॉटिंग केल्या गेल्या. ग्रामपंचायत मध्ये काहीना हाताशी धरून गावठाणा हद्दीत असलेल्या लेआउट मध्ये सुद्धा जमिनीचा ग्रामपंचायतच्या अभिलेखात नोंद करून ग्रामसेवकांनी निर्गमित केलेल्या गावठाण प्रमाणपत्र आधारे बोगस कारनामे केले आहे. आदिवासी समाजावर झालेल्या अन्यायाला वाच्या फोडण्यासाठी असंख्य जनसमुदाय सोबत असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपले धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे शंकर सिडाम म्हणाले.

संबंधित लेख

लोकप्रिय