हडपसर / डॉ. अतुल चौरे : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अंध, अपंग मुली-मुलांसाठी समुपदेशन, करिअर मार्गदर्शन पर सामाजिक कार्य केल्याबद्दल पुण्यातील समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल यांच्या वतीने मानसशास्त्र विभागाला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.महेश देवकर, प्रा. शिल्पा कुंभार व मानसशास्त्र विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, डॉ.राजेंद्र ठाकरे, प्रा. शुभम तांगडे इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.