Thursday, April 25, 2024
Homeकृषीकांद्यावरील निर्यात बंदी हटविण्याबरोबरच निर्यात कर कमी करा – खा.डॉ. अमोल कोल्हे...

कांद्यावरील निर्यात बंदी हटविण्याबरोबरच निर्यात कर कमी करा – खा.डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी

नवी दिल्ली : कांद्यावरील निर्यात बंदी हटविण्याबरोबरच निर्यात कर कमी करावा, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर व कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

खा. कोल्हे यांनी म्हटले आहे, “कांद्यावरील निर्यात बंदी उठवली तर कांद्याच्या अतिरिक्त साठ्याचा आणि उत्पादनाचा पेच कमी होईल व कांद्याचे भावही वाढतील, जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कल्याण होईल.

या मागणीवर, यावेळी मंत्रीमहोदयांनी राज्य सरकारने मार्केट इंटरव्हेन्शन स्कीमसाठी प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना केली. या संदर्भातही या पुढील काळात मी पाठपुरावा करणार आहे, असेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले. या भेटीवेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके हेही उपस्थित होते.

LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय