Wednesday, October 23, 2024
HomeहवामानHeavy rain : बंगळुरूमध्ये तुफान पाऊस, रस्ते जलमय, शाळा कॉलेज बंदचे आदेश

Heavy rain : बंगळुरूमध्ये तुफान पाऊस, रस्ते जलमय, शाळा कॉलेज बंदचे आदेश

बंगळुरू – कर्नाटकमध्ये, विशेषतः बंगळुरूमध्ये, मंगळवारी सकाळी पासून मुसळधार पावसामुळे सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. (Heavy rain)

पाण्याने भरलेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून, वाहने तासंतास अडकून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

आयटी पार्क सह संपूर्ण शहरात पावसाचे पाणी तुंबल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Heavy rain)

शहरात प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, उद्या शाळा बंद राहणार आहेत. शाळांना वरिष्ठ विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग घेण्यास सांगितले गेले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय