नांदेड : लोककल्याणकारी, मानवतावादी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने नांदेड येथील पूर्णाकृती पुतळा येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सीआयटीयु च्या वतीने अभिवादन करण्यात आले.
डोंगरदऱ्यात राहणाऱ्या दिन, दलित, कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, वंचित, उपेक्षित, भूमिहीन प्रजाजनांचे दुःख पाहून त्यांचे मन हेलावले. छत्रपतीच्या अंतःकरणामध्ये प्रचंड वात्सल्य होते.ते जसे स्वाभिमानी होते, तसेच ते प्रेमळ होते. त्यांनी आपल्या राज्यात अमुलाग्र बदल करण्याचा संकल्प केला.
शाहू महाराजांनी आपल्या राज्यात शिक्षणाचा प्रसार केला. प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे आणि मोफत केले. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, हे त्यांचे विचार होते. मंदिरातील पैसा शिक्षणासाठी वापरला. सर्व जाती धर्मातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृहांची स्थापना केली. मराठा बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, जैन बोर्डिंग, दलित बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग इत्यादी बोर्डिंगची स्थापना शाहू महाराजांनी केली. अशा महान क्रांतिकारी जनहितवादी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी कॉ.उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.गंगाधर आरसे, कॉ.मीना आरसे, कॉ.शाम सरोदे, कॉ.जयराज गायकवाड यांच्यासह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.