पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय खराळवाडी, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहरच्या वतीने क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामाजिक न्याय विभाग सरचिटणीस सिद्धार्थ जन्नू, उपाध्यक्ष शिवाजी गव्हाणे, उपाध्यक्ष निलेश खंडागळे, चिटणीस सत्तार शेख, इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.