Wednesday, December 4, 2024
Homeराज्यओबीसी आरक्षण विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी

ओबीसी आरक्षण विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी

मुंबई (सुशिल कुवर) : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एकमताने मंजूर केलेल्या ओबीसी राजकीय आरक्षण विधेयकाला अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे. या विधेयकावर त्यांनी स्वाक्षरी केल्यामुळे स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ब्रेकिंग : आता माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल

हिवाळी अधिवेशनात सभागृहात सर्व सदस्यांनी एकमताने ओबीसी राजकीय आरक्षण विधेयक मंजूर केले होते. त्यानंतर हे विधेयक राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, या विधेयकावर राज्यपाल कोश्यारी यांची स्वाक्षरी झालेली नव्हती. मंगळवारी आघाडी सरकारच्या नेत्यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. मात्र, त्यापूर्वीच राज्यपाल कोश्यारी यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली होती, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

अखेर आदिवासी शेतमजूरांचा छळ व मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक, शेतमजूरांनी प्राणांतिक उपोषण सोडले

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका न घेण्य़ाचा ठराव एकमतानं मंजूर झाला होता. त्यादृष्टीनं निवड निवडणूका पुढं ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. आता निवडणूक आयोग काय भूमिका घेणार याकडं लक्ष लागलं आहे.

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या उपसरपंचावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

‘अंडे आधी की कोंबडी?’ संशोधकांनी शोधले उत्तर

संबंधित लेख

लोकप्रिय