Wednesday, January 15, 2025
Homeताज्या बातम्यापुण्यात विद्यार्थ्यांची फ्रीस्टाईल हाणामारी, कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण

पुण्यात विद्यार्थ्यांची फ्रीस्टाईल हाणामारी, कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण

Pune : लोणी काळभोर येथील एमआयटी कॉर्नरजवळ सोमवारी दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून तिघांना लाठी-काठ्यांनी आणि दगडांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. मारहाणीत त्यांचे कपडे फाटेपर्यंत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

लोणी काळभोरच्या एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये खानावळीत वाद झाला होता. या वादाचे रूपांतर रस्त्यावर हाणामारीत झाले. ईस्ट हेवन सोसायटीजवळ झालेल्या या घटनेत एका वृद्धालाही दगड लागल्याचे समजते. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी हाणामारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले; मात्र त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ नये म्हणून त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे.

शैक्षणिक संकुलात वाढता तणाव (Pune)

लोणी काळभोर परिसरात असलेल्या शैक्षणिक संकुलात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. काही विद्यार्थी संकुलातील वसतीगृहात राहतात, तर काही भाडेतत्त्वावर फ्लॅट किंवा बाहेरील वसतीगृहांमध्ये वास्तव्य करतात. या परिसरात वादाच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र, अलीकडच्या काळात अशा घटनांची तीव्रता वाढल्याचे निदर्शनास येत आहे.

या घटनेने परिसरातील सुरक्षितता आणि शैक्षणिक वातावरणावर मोठा प्रश्न उभा केला आहे. प्रशासनाने आणि महाविद्यालयांनी यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…

सुंदर स्टेटस ठेवला अन् काही वेळातच भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

‘सारथी’मार्फत तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण, 10 हजार विद्यावेतन मिळणार

ज्येष्ठ गायक अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे निधन

एसटी प्रवाशांसाठी खूशखबर : लालपरीचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर मिळणार

१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

वडीलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन

संबंधित लेख

लोकप्रिय