Tuesday, September 17, 2024
Homeलाइफस्टाइलमहाराष्ट्रात पहिल्यांदाच मराठीत बसव विचारांची संगीत पर्वणी

महाराष्ट्रात पहिल्यांदाच मराठीत बसव विचारांची संगीत पर्वणी

 

म.बसवण्णांच्या वचनांवर आधारित “तूच जगाचा सांगाती” या अल्बम मधील “हातातील कंकणासी” हे चौथे गीत २० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ८ वाजता Tinos music india या युट्युब चॅनेलद्वारे तसेच विविध १५० समाज माध्यमांवर ऑनलाईन स्वरूपात प्रसारित होत आहे. या गीताचा टीजर नुकताच प्रसारित करण्यात आला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. म. बसवण्णांचे मूळ कन्नड वचन असलेल्या या गीताची भावानुवादीत रचना बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. प्रसिद्ध गायक तथा शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार व धारवाड येथील सुप्रसिद्ध गायिका श्रद्धा मूरशिळ्ळी यांचा सुमधुर आवाज या गीताला लाभला आहे.  

सेव्हन सेकंदस् क्लेक्टीव्ह फिल्मस् चे प्रसाद महेकर यांनी दिग्दर्शन व संकलन आणि प्रशांत सुतार यांनी छायाचित्रण केले आहे. याचे संगीत दिग्दर्शन विश्वास सुतार यांनी केले असून, स्वरतृप्ती रेकॉर्डिंग स्टुडिओचे ओंकार सुतार यांनी संगीत संयोजन व ध्वनिमुद्रण केले आहे. या गीतासाठी निर्मिती संयोजन यश आंबोळे यांनी केले आहे. टीनॉस म्युझिक इंडिया हे या गीताचे अधिकृत प्रसारक आहेत. कोल्हापूर लिंगायत समाज संस्था आणि बसव केंद्र, कोल्हापूर हे प्रायोजक आहेत.

    

वनरभक्षक महिला कर्मचाऱ्याला माजी सरपंचाची बेदम मारहाण

  

१० वी – १२ वी झालेल्यांना संधी ! भारतीय सीमा सुरक्षा दलात २७८८ जागांसाठी भरती

   महात्मा बसवण्णांच्या वचनांचा आशय प्रामुख्याने सामाजिक स्वरूपाचा, कालोचित असा परिवर्तनशील दृष्टीचा आहे. त्यांच्या महत्वपूर्ण वचनांचे आधुनिक माध्यमांशी सुसंगत असे माध्यमांतर करण्याच्या सर्जनात्मक कल्पनेस मूर्त स्वरूप देण्याचा प्रकल्प कोल्हापूर लिंगायत समाज संस्थेने हाती घेतला आहे. महात्मा बसवण्णांच्या निवडक वचनांच्या मराठी भावानुवादाचा दृकश्राव्य स्वराविष्काराच्या रूपाने माध्यमांतर सध्या केले जात आहे. बसवादी शरणांच्या वचनांचे मराठीत प्रथमच असे माध्यमांतर होत आहे. 

महाराष्ट्र जनभुमीच्या सर्व प्रेक्षकांना एक नम्र आवाहन त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून या मनाला तृप्त करणाऱ्या बसव विचार वाणीचा आस्वाद घ्यावा.

ज्योती बसू : पक्ष निर्णयानुसार पंतप्रधान पद नाकारणारे, पश्चिम बंगालचे सलग २३ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नेते

      

संबंधित लेख

लोकप्रिय