नवी दिल्ली : सध्याच्या घडीला स्मार्ट फोन वापरणारा कोणताही व्यक्ती सोशल मीडियापासून दूर राहु शकत नाही. फेसबुक आणि इंस्टाग्राम हे सध्याचे सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पैकी एक आहे. मात्र आता हे तरुणांच्या आवडीचे असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी लवकरच शुल्क आकारले जाणार आहे.
सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येकाला आपापल्या अकाउंटवर सातत्याने काही तरी पोस्ट करावेसे वाटते. आता लवकरच फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या रिफायड अकाउंट साठी मेटा प्रतिमहीने 699 रुपये यूजर्सकडून वसूल करणार आहे. एलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी गेल्यानंतर त्यांनी वेरिफायड अकाउंट साठी म्हणजेच ब्लु टिकसाठी शुल्क आकारण्यास सुरूवात केली आहे. आता फेसबुक आणि इंस्टाग्राम साठी देखील मेटा शुल्क आकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मेटा ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतातील यूजर्ससाठी iOS आणि Android वर वेरिफायड अकाउंटसाठी 699 रुपयांचे मासिक शुल्क सुरु केलं आहे. येत्या काही महिन्यांत, आम्ही 599 रुपये प्रति महिना वेब साठी सुद्धा पर्याय सादर करू. व्हेरिफाईड अकाउंट सबस्क्रिप्शनसाठी, फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरकर्त्यांना त्यांचे खाते सरकारी आयडीने व्हेरिफाय करावे लागेल. व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन घेणाऱ्या युजर्सना अनेक विशेष फीचर्सचा लाभ मिळणार आहे.व व्हेरिफाईड अकाउंटला सुरक्षा आणि सपोर्ट मिळेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये सुरुवातीच्या टेस्टिंग मध्ये अनुकूल परिणाम पाहिल्यानंतर कंपनी भारतात मेटा पडताळणीच्या चाचणीचा विस्तार करत आहे असेही कंपनीने म्हंटल आहे.
हे ही वाचा :
गावाचा विकास साधायचाय ? चला तर समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा…
आदिवासी विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘स्वयम्’ योजना’ वाचा सविस्तर!
‘आया बहिणी या सरकारच्या राज्यात सुरक्षित नाहीत’, आव्हाड म्हणाले, ‘धार्मिक गोष्टींच्या राजकारण…’
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहायक उद्यान निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
नोकरी संबंधित बातम्या :
ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती
IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज
Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती