Wednesday, June 19, 2024
Homeक्राईमखळबळजनक! करौली आश्रमात 1.5 लाखांचा होम करताच मुलगा बेपत्ता, दुसऱ्या दिवशी वडील...

खळबळजनक! करौली आश्रमात 1.5 लाखांचा होम करताच मुलगा बेपत्ता, दुसऱ्या दिवशी वडील गायब

डॉ सिद्धार्थ चौधरी यांना मारहाण केल्याच्या आरोपानंतर चर्चेत आलेले कानपूरचे करौली बाबा संतोष सिंह भदौरिया यांना आणखी एका आरोपाला सामोरे जावे लागले आहे. झारखंडमधून उपचारासाठी आलेल्या एका कुटुंबाने करौली आश्रमावरच आता सवाल उपस्थित केला आहे.

कुटुंबीय आपल्या लहान मुलावर उपचार करण्यासाठी करौली आश्रमात आले होते, मात्र कुटुंबप्रमुख आणि आजारी मुलगा आश्रमातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घ़डली आहे.

आरोपानुसार, झारखंडमधील देवघर येथील एक कुटुंब आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी 24 जानेवारीला करौली आश्रमात आले होते. हे कुटुंब करौली शंकर महादेवाच्या दरबारात पोहोचले होते. करौली शंकर महादेव यांनी होम-हवन करण्याची सूचना केली होती. दीड लाख रुपयांचा होम करावा, असे आश्रमाच्या वतीने सांगण्यात आले. 25 जानेवारी रोजी कुटुंबाच्या वतीने दीड लाख रुपये खर्च करून होम करण्यात आला.

होम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारीला आजारी मुलगा बेपत्ता झाला. तर त्यानंतर 27 जानेवारी रोजी कुटुंबप्रमुख अचानक गायब झाले. यानंतर कुटुंबीयांच्या वतीने दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. जवळपास 10 दिवसांनंतर आश्रमापासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात एक मानसिकरित्या आजारी मुलगा सापडला. कुटुंबीयांनी त्याला परत आणले, मात्र वडिलांचा ठावठिकाणा लागला नाही. यानंतर कुटुंबीयांनी 9 फेब्रुवारी रोजी कानपूरमधील विधनू पोलीस ठाण्यात व्यक्ती हरवल्याची तक्रार नोंदवली होती. दोन महिने झाले तरी वडील बेपत्ता आहेत.

कानपूरचे पोलीस अधिकारी म्हणाले की, आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत, आम्ही आवश्यक त्या सर्वांची चौकशी करू. करौली आश्रमाचे बाबा संतोष सिंह भदौरिया यांच्यावर त्यांच्याच भक्ताने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. बाबा संतोष सिंह भदोरिया यांचे भक्त सिद्धार्थ चौधरी म्हणाले की, “मी करौली बाबांचे व्हिडीओ यूट्यूबवर खूप बघायचो, त्यांच्यामुळे प्रभावित होऊन मी माझ्या वडील आणि पत्नीसोबत नोएडाहून त्यांच्या आश्रमात गेलो. पण त्यांनी मला बेदम मारहाण केली.” एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय