Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयकव्हर स्टोरीबोमन अन् बेलीच्या हाती 'ऑस्कर'; नेटीझन्ससह सेलिब्रिटींनाही भावलं 'गोड हसू'

बोमन अन् बेलीच्या हाती ‘ऑस्कर’; नेटीझन्ससह सेलिब्रिटींनाही भावलं ‘गोड हसू’

भारतीय सिनेजगतासाठी यंदाचा ऑस्कर अवॉर्ड खूप खास ठरलाय. संपूर्ण देशाचं लक्ष यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे लागलं होतं आणि भारताने यंदा दोन पुरस्कार नावावर केले.

सोहळ्यात देशाला पहिला ऑस्कर मिळाला तो ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ (The Elephant Whisperers) या शॉर्ट फिल्मसाठी. कार्तिकी गोन्साल्वीस यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. जंगलातील हत्तींचा सांभाळ करणाऱ्या माहुत जोडप्याची ही गोष्ट असून ही कथा ७० मिमि पडद्यावर आणल्यामुळे ती जगासमोर झळकली. ‘द एलिफंट व्हिस्पर्स’चे खरे हिरो आहेत, बोमन आणि बेल्ली. दिग्दर्शक कार्तिकीने बोमन अन् बेल्लीच्या हाती ऑस्कर विजयाची ट्रॉफी दिलीय. यावेळी, दोघांच्याही चेहऱ्यावरील हास्य सर्वांचंच मन सुखावणारं आहे

“आम्ही वेगळे राहून चार महिने झाले आहेत आणि आता मला वाटतं की मी घरी आहे…”, असे म्हणत कार्तिकी गोन्साल्वीस यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. अर्थातच नेटीझन्ससह सेलिब्रिटींनाही हा फोटो चांगलाच भावला आहे. बोमन आणि बेल्लीचा ऑस्कर ट्रॉफीसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो फोटो पाहून, हे सांगण्याची गरज नाही, या सुंदर प्रतिमेने इंटरनेटवर सर्वांना जिंकलय, असा रिप्लाय संगीतकार विशाल ददलानीने कार्तिकी यांच्या पोस्टला दिलाय. तर “सहजच, माझा आवडता ऑस्कर पिक्चर” असे अभिनेत्री ईशा गुप्ताने म्हटलंय, त्यासह तिने हर्ट इमोजीही दिले आहेत. हा फोटो पाहून ‘ओह माय गॉड’, असा रिप्लाय आहाना कुमरा हिने केलाय.

‘द एलिफंट व्हिस्पर्स’ ही रियल स्टोरी


‘द एलिफंट व्हिस्पर्स’ ही खऱ्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म असून कार्तिकी गोंजाल्विस (Kartiki Gonsalves) यांनी दिग्दर्शित केली आहे. याची कहाणी बोमन आणि बेली यांच्या जीवनावर आधारित आहे. हे एक आदिवासी जोडपं आहे. आदिवासी पाड्यात राहणापे रघु आणि अम्मु या दोन हत्तींचं त्यांनी पालन केलं आणि त्यांना चांगलं जीवन दिलं. ४० मिनिटांच्या या फिल्ममध्ये मनुष्य आणि प्राण्यांमधील भावनिक, संवेदनशीलृ दृश्य दाखवण्यात आली आहे.सामान्य आयुष्य जगणारे बोमन आणि बेली यांचा प्राण्यांप्रती असलेले प्रेम आणि त्यांचा संघर्ष यावर फिल्म आधारित आहे.

तमिळनाडूच्या मुदाममल्लई नॅशनल पार्क मधील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या बोमन आणि बेली यांना २०१७ मध्ये एक जखमी हत्तीचे पिल्लू सापडले. या जोडप्याने त्या पिल्लाची काळजी घेतली. त्याला बरे केले. त्याचं नाव रघु ठेवले. यानंतर अजुन एक हत्ती त्यांच्यासोबत जोडला गेला. त्याचे नाव अम्मु ठेवण्यात आले. रघु मोठा झाल्यावर त्याच्या सुरक्षेसाठी त्याला एका योग्य माणसाकडे सोपवले. आता या फॅमिलीत केवळ बोमन, बेली आणि अम्मु राहिले आहेत जे आनंदात जगत आहेत आणि रघुला मिस करत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय