Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याLegislative Council शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Legislative Council शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Legislative Council : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया 10 जून 2024 रोजी पार पडणार होती. तथापि, या निवडणुका शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर घेण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाले.

त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवाषिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. (Legislative Council)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Tourism : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जा, दक्षिण भारतात

POK : हैं हक्क हमारा आझादी, पाकव्याप्त काश्मिरी जनता रस्त्यावर

मोठी बातमी : मुंबईत वादळी पावसाने होर्डिंग कोसळून ३ ठार, १०० अडकले

Rain : मुंबई, ठाणे येथे मुसळधार सुरू

बाकी कंपन्यांचे उडाले होश, ‘ही’ कंपनी देशात आणतेय जगातील पहिली CNG बाईक

अफगाणिस्तानात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक मृत्यू, हजारो विस्थापित

Condom : अबब अजबच ! तरुणाईला लागले फ्लेव्हर्ड कंडोमचं पाणी पिण्याचे व्यसन ?

संबंधित लेख

लोकप्रिय