Eknath Shinde : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेसाठी दिलेली 10 महत्त्वाची आश्वासने चर्चेत आहेत. कोल्हापूर येथील सभेत मुख्यमंत्री शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील विविध योजना आणि कलमांची घोषणा करत आगामी योजनांची दिशा स्पष्ट केली.
“1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूरमधूनच प्रचाराचा शुभारंभ केला आणि इतिहास घडला. आई अंबाबाईने नेहमीच आम्हाला आशीर्वाद दिला आहे, आता देखील आई अंबाबाई आम्हाला आशीर्वाद देईल. यावेळी, 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथं येऊ. तत्पूर्वी, वचननाम्यातील 10 कलमं जनतेसमोर ठेवतो आहे”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मोठ्या घोषणा केल्या.
मुख्यमंत्री शिंदेंच्या 10 प्रमुख घोषणांमध्ये राज्यातील लाडक्या बहिणींसाठी दरमहा 2100 रुपये मिळण्याचा महत्वपूर्ण निर्णय समाविष्ट आहे. शिवाय, महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांची पोलीस दलात भरती होणार असल्याचे आश्वासन देत, महिला सक्षमीकरणासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा :
- लाडकी बहीण योजना : राज्यातील बहिणींना दरमहा 2100 रुपये दिले जातील.
- महिला पोलीस भरती :राज्य पोलीस दलात 25,000 महिलांची भरती केली जाईल.
- शेतकरी कल्याण : शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच सन्मान योजनेतून 15,000 रुपयांची मदत.
- अन्न आणि निवारा : राज्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी अन्न आणि निवाऱ्याची हमी.
- वृद्धांसाठी आर्थिक मदत : वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपयांची आर्थिक मदत.
- जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर : दरांवर नियंत्रण ठेवून वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे आश्वासन.
- तरुणांसाठी रोजगार : राज्यातील तरुणांसाठी 25 लाख रोजगार संधी उपलब्ध करून देणार.
- रस्ते बांधकाम : 45,000 पांदण रस्ते बांधून ग्रामीण भागाचा विकास.
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स : अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांना 15,000 रुपये वेतन.
- वीज बिलात सवलत : वीज बिलात 30% कपात देण्याचा निर्णय.
मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी आश्वासन दिलं की, येत्या 100 दिवसांत ‘व्हिजन महाराष्ट्र 2029’ योजना सादर करून राज्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल. घोषणांमुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून,या घोषणा निवडणुकीपूर्वी महायुतीसाठी एक गेमचेंजर ठरू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Eknath Shinde
हेही वाचा :
उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने
दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त ; ग्राहकांसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर
रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश
दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत
मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर