आळंदी / अर्जुन मेदनकर : आळंदीत पर्यावरण पूरक गणेशोत्सवास केलेल्या आवाहना प्रमाणे नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करीत आहेत. या अंतर्गत अनेक ठिकाणी पर्यावरण पूरक देखावे तयार करण्यात आले आहेत. यात येथील सामाजिक कार्यकर्ते अमित कुर्हाडे यांचे घरी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्रातील विविध प्रसंगावर आधारित लक्षवेधी शिवचरित्राचा देखावा आळंदीकरांचे लक्ष वेधून घेत आहे. परिसरातून भाविक, नागरिक श्रींचा देखावा पाहण्यास टेनिस वाटिका या गृह संकुलात गर्दी करू लागले आहेत. Domestic Ganesha decoration in Alanya complements the environment
सौ व श्री अमित कुऱ्हाडे यांनी परिश्रम पूर्वक श्रींचे देखाव्यासाठी सजावट केली असून यात शिवचरित्रातील श्रींचा जन्मोत्सव पाळणा, स्वराज्य शपथ, तुळजा भवानी तलवार भेट, संत तुकाराम महाराज भेट, अफजलखान वध, शिवराज्याभिषेख सोहळा, श्रींचे किल्ले आदी प्रसंगावर आधारित हलते प्रसंग दाखवीत लक्ष वेधले आहे. यासाठी अमित कुऱ्हाडे परिवाराने खूप मेहनत घेत गणेशोत्सवातील लक्षवेधी सजावटीची परंपरा जोपासली आहे. अनेक वर्षांपासून त्यांचे कडे गणेशोत्सवात लक्षवेधी सजावट केली जाते. रंगसंगती, विद्युत रोषणाई, संगीत, इको फ्रेंडली साहित्याचा वापर यासाठी केल्याचे कुऱ्हाडे यांनी सांगितले.
आळंदीतील लक्षवेधी देखावे तयार करण्याची त्यांतून समाज प्रबोधन करण्यास प्रेरणा देण्याचे कार्य अंत कुऱ्हाडे पाटील गेल्या अनेक वर्षां पासून करीत आहेत. याच बरोबर श्रींचे मूर्ती गणेश भक्तांना एच्छिक मोबदला जे जेटली तो स्वीकारून श्रींचे मूर्ती घराघरात पोहोचविण्याचे कार्य देखील ते अनेक वर्षां पासून राबवित आहे. या सेवेचे कौतुक आळंदी शहर शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल चव्हाण, अविनाश राळे, सचिन महाराज शिंदे, नितीन ननवरे आदींनी भेट देऊन केले.
येथील श्री रामकृष्ण शिक्षण संस्था, महावैष्णव वारकरी शिंशां संस्था आणि ज्ञानराज मित्र मंडळ येथे धार्मिक उत्साहात श्रींची आरती आणि गणेशोत्सवास सुरुवात झाली असून वारकरी विद्यार्थ्यानी वारकरी संप्रदायाच्या परंपरांचे पालन करीत श्रींची आरती, पूजा प्रसंगी टाळ, मृदंग , वीणेच्या त्रिनादात हरिनाम गजर केला. यावेळी मोहन महाराज शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जाधव, निसार सय्यद आणि ज्ञानराज मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आळंदी शहरात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करून ध्वनी, जल आणि वायू प्रदूषण न करण्याचे आवाहन आळंदी नगरपालिकेने केले आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सवा साठी श्रींचे मूर्ती शाडू मातीच्या बनविण्यास प्रशिक्षण देऊन यात पुढाकार घेतला. श्रींचे मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या न घेता शाडू मातीच्या तसेच पर्यावरण पूरक बनवून प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आळंदीतील ग्रामस्थ आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात आळंदी पंचक्रोशीत कायदा, शांतता सुव्यवस्था कायम राहील याची दक्षता घेण्याचे आवाहन आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले आहे.
गणेश उत्सवात ध्वनी, जल, वायू प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊन उत्सव पर्यावरण पूरक व्हावा यासाठी सार्वजनिक उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांना प्रशासनाने आवाहन केले आहे. गणेशोत्सवाचे पावित्र्य जोपासले जावे. तसेच पर्यावरण संवर्धन या सामाजिक उपक्रमासाठी नागरिकांसह गणेशोत्सव साजरे करणाऱ्या मंडळांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच श्रींच्या मूर्तींचे विसर्जन हे थेट इंद्रायणी नदीत न करता आळंदी नगरपालिकेने विकसित केलेल्या तात्पुरत्या हौद्यात करावे असे आवाहन आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे. गणेश उत्सव काळात साचलेले पूजा साहित्य निर्माल्या हे इंद्रायणी नदीत न टाकता इंद्रायणी नदी कडेला असलेल्या घंटागाडी निर्माल्य कुंडात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माझी वसुंधरा अभियान ४.० पर्यावरण पूरक गणेशोत्सव व स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत आळंदी नगरपालिकेने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
यासाठी जनजागृती करण्यात येत असून माझी वसुंधरा अभियान ४.० तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मोहिमे अंतर्गत आळंदी नगरपालिकेने स्वच्छतेस प्राधान्य देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास आवाहन केले आहे. आळंदी पंचक्रोशीतील घराघरांत गौरीचे आगमन परंपरांचे पालन करीत झाले. उद्या शुक्रवारी (दि. २२) गौरी पूजन होत आहे. त्या निमित्त गौरीस महानैवेद्य आणि महिलांचे हळदी कुंकू ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.