मुंबई : गेल्या काही काळात वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडी मोडून काढली आहे. मात्र सणासुदीत काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यातच दिवाळी तोंडावर शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी एक मोठा निर्णय घेत दिलासा मिळणार आहे
सरकारकडून रेशन कार्ड धारकांना 100 रुपयात रवा, डाळ, साखर आणि तेल हे साहित्य देणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दिवाळी तोंडावर आल्याने कमी कालावधीत नागरिकांना या वस्तूंचा पुरवठा करावा, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत, यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ होणार आहे. शिधा पत्रिका धारकांना रवा, चणाडाळ, साखर व तेल (प्रत्येकी एक किलो पॅकेज) केवळ शंभर रुपयांत दिले जाणार आहेत..