Wednesday, February 12, 2025

PCMC : विकसित भारत संकल्प यात्रा पिंपरी चिंचवड शहरात दाखल 

‘आपला संकल्प विकसित भारत’ चित्ररथ करणार जनजागृती

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : देशाच्या आदिवासी तसेच ग्रामीण भागात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहचल्यानंतर आजपासून शहरी भागातून देखील या यात्रेचा शुभारंभ संभाजी-शाहू उद्यान, संभाजीनगर, चिंचवड येथे झाला. केंद्र सरकारच्या योजनांविषयी जनजागृती करण्यासाठी सुरू झालेला हा उपक्रम दोन महीने सुरू राहणार आहे. लोकांनी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, तसेच अजूनही योजनांच्या लाभापासून दूर असलेल्या नागरिकांपर्यंत शासकीय यंत्रणा पोहचवी असा उद्देश या यात्रेमागे आहे.

गरीब – वंचित यांच्यापर्यंत राज्य व केंद्रशासनाच्या योजना पोहचवणे, ही आमची जवाबदारी महानगरपालिकेचे आयुक्तांची आहे. परंतु या संदर्भात जनतेमध्ये जनजागृती न केल्यामुळे हजारो लोक या सुविधा पासून वंचित आहेत.

शासनाच्या आयुषमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, पंडीत दीनदयाल अंत्योदय योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पोषण आहार योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, भारतीय डाक विभागातील योजना या विविध योजनेचा लाभ मिळवण्यासाठी यावेळी अनेकांनी नावनोंदणी. यात्रेच्या ठिकाणी महिलांची आरोग्य तपासणी रक्त तपासणीची विशेष मोहीम महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय विभाग राबवणार आहे.

स्थानिक पातळीवर माहितीचा अंधार असतो – तुषार हिंगे

सरकार जेव्हा एखादी योजना जाहीर करत असताना ‘अधिक माहितीसाठी स्थानिक केंद्रांशी संपर्क करा’ अशी माहिती देते खरे, पण स्थानिक पातळीवर माहितीचा अंधार असतो आणि सरकारी केंद्रावर किंवा ऑफिसमध्ये आधीच उल्हास असतो. त्यात अजून एक योजना म्हणजे फाल्गुन मास … त्यामुळे योजनांची व्यवस्थित माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे हजारो नागरिक घरापर्यंत चालून आलेल्या शासकीय योजना पासून वंचित राहतात लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला वाईट वाटते, असेही माजी नगरसेवक तुषार हिंगे म्हणाले.

शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचत नाही – शिवानंद चौगुले 

भाबड्या लोकांची धारणा असते की सरकारी लोक ज्या काही घोषणा जनतेच्या भल्यासाठी म्हणून करतात त्या खरोखरच लोकांच्या हितासाठी असतात. असे काही ही नसते. गरिबांच्या नावावर आलेली कोणतीच योजना खऱ्या गरिबांपर्यंत पोचत नाही. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचत नाही, कारण स्थानिक पातळीवरील कचेऱ्यांत योजनांचा पूर्ण तपशील पोहोचलेला नसतो, त्यांनी माहिती करून घेतलेला नसतो पर्यायाने लोकांपर्यंत पोहोचत नाही, असेही सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले म्हणाले.

Mahaegs Maharashtra Recruitment

Related Articles

- Advertisement -

Latest Articles