Home ताज्या बातम्या ‘कुणी दगडफेक करायला सांगितली’ मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

‘कुणी दगडफेक करायला सांगितली’ मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Deputy Chief Minister Devendra Fadnavis will also conduct an SIT inquiry into Manoj Jarange's agitation

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली होती. यावर विधानसभा अध्यक्षांनी चौकशीचे निर्देश दिले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल असे सांगितले.

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, SIT गठीत करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल. मला या विषयावर बोलायचे नव्हते, पण बोलावे लागते आहे. मराठा आरक्षण माझ्याच कार्यकाळात दिले गेले. ते हायकोर्टात टिकविले आणि मी मुख्यमंत्री असेपर्यंत सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकविले, असे ते म्हणाले.

पुढे फडणवीस म्हणाले, या संपूर्ण काळात सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आदी अनेक उपाय केले आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला झाला आणि आजही होतो आहे. त्यामुळेच संपूर्ण मराठा समाज माझ्या मागे उभा राहिला आणि आहे. पण मला आई-बहिणीच्या शिव्या द्यायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, हा काय प्रकार? कुणाकडे बैठक झाली, कुणी दगडफेक करायला सांगितली, ते आता आरोपी सांगत आहेत! या संपूर्ण प्रकारात बीडच्या घटना कशा विसरता येतील? तुम्ही राजकारण कुठल्या स्तराला घेऊन निघाले आहात? कुणाचे कार्यकर्ते आहेत? कोण पैसा देते आहे? हे सारे समोर येते आहे आणि येईलच. असेही ते म्हणाले.

मला जरांगे यांच्यावर काहीच बोलायचे नाही. पण त्यांचा बोलविता धनी कोण? हे शोधून काढले जाईल. छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईत वॉररूम कुणी सुरू केल्या, हेही तपासात पुढे येते आहे. एक नक्की हे संपूर्ण षडयंत्र पुढे आणले जाईल. अशी शिवीगाळ कुणालाही झाली, मग ते विरोधक का असेना, तर त्याच्यासोबत उभा राहणारा हा देवेंद्र फडणवीस पहिला असेल ! असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.

हेही वाचा :

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी, त्यांची एसआयटी चौकशीही होणार

यूट्यूबर ध्रुव राठीचा व्हिडिओ शेअर केल्याने अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात मागितली माफी

भयंकर अपघात : एकावेळी 23 जणांचा मृत्यू, अनेक घरात आरडा ओरडा

ब्रेकिंग : ५ हजार ६०५अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यभरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, प्रचंड गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

आशा सेविकांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक

एका दातामुळे आमदार संजय गायकवाड अडचणीत वाढ

Exit mobile version