नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी राजोकरी येथील राजकिया सर्वोदय कन्या विद्यालयात राष्ट्रीय राजधानीतील 240 सरकारी शाळांमध्ये 12,430 नवीन स्मार्ट क्लासरूम्सचे उद्घाटन केले.
दिल्लीत शैक्षणिक क्रांती होत आहे. त्यामुळे अनेक चांगले परिणाम आले आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांचा निकाल चांगला लागतो. मला दिल्लीतील लोकांचे अभिनंदन करायचे आहे,” असे केजरीवाल स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन करताना म्हणाले.
या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “दिल्ली सरकारने गेल्या सात वर्षांत एकूण 7,000 वर्गखोल्या बांधल्या आहेत. सर्व राज्य आणि केंद्र सरकार मिळून या काळात 20,000 वर्गखोल्या उभारू शकले नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण मिळायला हवे.त्यांचं आदर्श डोळ्यापुढे ठेवून आप ने शाळा उभारली.”
पंजाब निवडणूक : सोनू सूदला मतदान केंद्रावर जात असताना रोखले, वाहनही केले जप्त
कोरोना निर्बंधांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना घोड्याच्या पायाखाली चिरडले