Tuesday, September 17, 2024
Homeराष्ट्रीयपंजाब निवडणूक : सोनू सूदला मतदान केंद्रावर जात असताना रोखले, वाहनही केले...

पंजाब निवडणूक : सोनू सूदला मतदान केंद्रावर जात असताना रोखले, वाहनही केले जप्त

Photo : Facebook

मोगा : पंजाबच्या ११७ सदस्यीय विधानसभेसाठी (विधानसभा निवडणूक २०२२) मतदान सुरू आहे. सोनू सूदची बहीण मालविका काँग्रेसच्या तिकीटावर मोगामधून निवडणूक लढवत आहे. अभिनेता सोनू सूद देखील आपल्या बहिणीच्या प्रचारासाठी पंजाबमध्ये आहे. रविवारी मतदानादरम्यान सोनू सूद एका मतदान केंद्रावर जाण्याचा प्रयत्न करत असताना निवडणूक आयोगाने त्याला रोखले आणि त्यांची कार जप्त करण्यात आली.

मोगा जिल्ह्याचे पीआरओ प्रभदीप सिंह यांनी सांगितले की, सोनू सूद एका मतदान केंद्रात जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्यांची कार जप्त करून घरी पाठवण्यात आले. घर सोडल्यास कारवाई केली जाईल. 

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

सोनू सूद मतदार नसताना, तो बूथवर जात असल्यामुळे त्याला थांबवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. शिरोमणी अकाली दलाने तक्रार दाखल केल्यानंतर सोनू सूदवर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.

यावर सोनू सूद म्हणाला की, आम्हाला निष्पक्ष निवडणुका हव्या आहेत. विरोधकांकडून, विशेषत: अकाली दलाकडून, विविध बूथवर धमक्या येत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. काही बूथवर पैसे वाटले जात आहेत. त्यामुळे तपास करणे आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून आम्ही बाहेर पडलो. या संबंधीचे वृत्त एनडिटिव्हीने दिले आहे.

एकाकीपणा घालवण्यासाठी युनायटेड किंगडमने स्थापन केले मंत्रिमंडळ!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 588 जागांसाठी भरती ! आजच अर्ज करा

संबंधित लेख

लोकप्रिय