Thursday, December 5, 2024
Homeराज्यडॉ. पायल तडवी केसची सद्यस्थिती - डॉ. संजय दाभाडे.

डॉ. पायल तडवी केसची सद्यस्थिती – डॉ. संजय दाभाडे.

डॉ.पायल तडवीच्या केस मधील तिन्ही आरोपींंना शिक्षण सुरु ठेवण्यास मनाई करणारा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. खरं तर उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती वारंवार त्या आरोपींना शिकू देण्याच्या बाजूने होते. परंतु त्यास जोरदार विरोध केला व त्यासाठी योग्य वकील दिला होता.

ऍडव्होकेट दिशा वाडेकर ह्यांनी ह्यावर सखोल अभ्यास करून संबंधित आपल्या वकिलांना व्यवस्थित ब्रिफींग केले होते. आता आरोपी मुली सर्वोच्च न्यायालयात गेल्या आहेत, हायकोर्टाच्या निकाला विरुद्ध. तिथं देखील ऍडव्होकेट दिशा वाडेकरांनी चांगले वकील मिळण्यासाठी धडपड केली आहे व उद्या ११ वाजता सर्वोच्च न्यायालयात ह्या प्रकरणी सुनावणी होत आहे. 

आताच पायलच्या आईशी बोलणं झालं आहे. आपल्या बाजूने पुरेशी तयारी केली आहे. बघूयात  उद्या काय होते. दुसरे महत्वाचे असे कि पायलची मूळ केस सेशन कोर्टात सुरु आहे व चार्ज शीट बऱ्यापैकी आपल्या बाजूने असून पोलिसांनी योग्य तपास केला आहे. परंतु तेवढे पुरेसे नाही.

म्हणून पायलच्या आईच्या बाजूने स्पेशल सरकारी वकील ( ऍट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी नुसार ) नेमण्याची मागणी पायलच्या आईने केली असून तसे पत्र मंत्री के.सी.पाडवींना दिले होते. थोड्या वेळापूर्वीच मला मंत्री पाडवी ह्यांच्या पीएस व ओएसडी ह्यांचे मेसेज मिळालेत कि वकील देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मंत्री पाडवी लक्ष देत आहेत. एकंदरीत पायल ची केस पुढे सरकत आहे.

डॉ.संजय दाभाडेपुणे 

९८२३५२९५०५

संबंधित लेख

लोकप्रिय