महाराष्ट्र जनभूमी :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोने विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोध जनतेने आंदोलन करण्याची हाक दिली होती. माकपाच्या वतीने सातारा जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले.
इन्कम टॅक्स लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला सहा महिने दरमहा ७ हजार ५०० रुपये रोख दिले पाहिजेत, सहा महिने दरडोई १० किलो धान्य मोफत पुरवले पाहिजे, मनरेगा अंतर्गत वाढीव मजुरी देऊन किमान २०० दिवस रोजगार पुरवला पाहिजे. शहरी गरिबांसाठीसुद्धा ही योजना लागू करा. बेरोजगारांना ताबडतोबीने बेरोजगार भत्ता जाहीर करा, राष्ट्रीय संपत्तीची लूट, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवा; कामगार कायदे रद्द करायचे धोरण मागे घ्या, सर्व शेतकऱ्यांना तातडीने कर्ज माफ करुन, तात्काळ नविन कर्ज वाटप करा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात माकपचे जिल्हा सरचिटणीस माणिक अवघडे, वसंत नलवडे, आनंदी अवघडे, सलिम अत्तार, दत्ता राऊत, सायली अवघडे आदी सहभागी झाले होते.