Friday, December 27, 2024
Homeआरोग्यकोरोनाकोरोना रुग्णासाठी एसआरए'च्या सदनिका नको अंबानीचा टॉवर ॲन्टीलिया ताब्यात घ्या - भाकप

कोरोना रुग्णासाठी एसआरए’च्या सदनिका नको अंबानीचा टॉवर ॲन्टीलिया ताब्यात घ्या – भाकप

प्रतिनिधी :- जुन्या चाळीतील व झोपडपट्टी रहिवाशांसाठी पुर्नविकासानंतर तयार होत असलेली घरे कोरोना रुग्णासाठी ताब्यात घेण्याची योजना मुंबई महापालिकेनी रद्द करावी अन्यथा रहिवासी अंबानीच्या बंगल्यात व टॉवरमधील रिकाम्या फ्लॅटमध्ये घुसतील असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई सेक्रेटरी प्रकाश रेड्डी यांनी दिला आहे.

            मुंबई सारख्या कष्टकरांच्या शहरात जुन्या चाळीत व झोपडपट्टयात लाखो लोग अनेक पिढ्या राहात आहेत. त्यांचा पुनर्विकासही अनेक वर्षे प्रलंबित आहे. आपली घरे रिकामी करून १०, १५, २० वर्षे ट्रॅन्झिट कॅम्प मध्ये घरांच्या प्रतिक्षेत आहेत किंवा अनेक ठिकाणी राहात आहेत. अनेक ठिकाणी विकासकाने भाडीही देणे बंद केले आहे. त्यामुळे ते आधिच अडचणीत आहेत. त्यांना त्यांची हक्काची घरे ताबडतोब मिळाली पाहिजेत. त्यासाठी सरकारने पावले उचलावीत.

               असे असताना जे प्रोजेक्ट तयार होण्याच्या अवस्थेत आहेत तिथली घरे मुंबई महानगरपालिका करोना रुग्णासाठी ताब्यात घेत आहे. हा रहिवाशांवर अन्याय आहे. त्या सदनिका मूळ रहिवाशांना देण्याचे कायदेशिर बंधन सरकारवर, महापालिकेवर, म्हाडावर,एसआरए वर आहे. त्यासाठी काही जण कोर्टात गेले आहेत.

            भारतीय कम्युनिस्ट पक्ष मागणी करत आहे की महापालिकेने हा निर्णय मागे घ्यावा. या शहरात लाखो मुंबईकरांना हक्काची घरे ताबडतोब मिळालीच पाहिजेत. सरकारने भुखंड बिल्डरांना देणे व मोकाळ्या जागा, बंद पडणाऱ्या कारखान्याच्या जागा टॉवर, मॉल्ससाठी देणे बंद करावे. त्यावर सरकारी कायम स्वरूपाची हॉस्पिटल्स बांधावीत. ह्या शहरात असंख्य टॉवर ऊभे राहिलेले आहेत. त्यातील अनेक फ्लॅट्स केवळ गुतवणुकीसाठी घेऊन ठेवलेले आहेत ते रिकामे आहेत ते ताब्यात घ्या.

               मुंबईमध्ये अंबानी कुटुंबाची २२ मजल्याची बिल्डिंग आहे. ५ जणांचे कुटुंब आहे. एका व्यक्तिला एक मजला दिला तरी १७ मजले उरतात. असे अनेक श्रीमंतांचे बंगले आहेत. ते कोरोना रूग्णासाठी ताब्यात घ्या. महालक्ष्मीचे गोल्फ मैदान आहे. त्यांना आधीच उपनगरात जागा दिली आहे. ते ताब्यात घ्या. सर्व पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घ्या. कष्टकऱ्यांच्या घराचा ताबा घेतला तर अंबानीच्या अंटीलीया मध्ये भाडेकरू, रहिवासी घुसतील असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दिला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय