Hardik Pandya : इंडियन प्रीमियर लीग-2024 मध्ये, 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) ला त्यांच्या पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर टीमचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माला कुठे फिल्डिंगसाठी उभे रहा हे सांगत आहे आणि रोहित इकडे-तिकडे धावताना दिसत आहे. याचा एक व्हिडिओ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IPL-2024 च्या हंगामात हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचा (MI) चा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सचा माजी आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या हे दोघे एकत्र खेळताना पाहण्यासाठी चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. २४ मार्च रोजी मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात चाहत्यांची ही इच्छा पूर्ण झाली. मात्र या सामन्या दरम्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून सर्वत्र त्याच व्हिडिओची चर्चा होत आहे.
मोटेरा स्टेडियमवर हार्दिक नाणेफेकीसाठी मैदानात उतरला. हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सामना सुरू झाला. त्यावेळी हार्दिक पांड्याने फिल्डिंग लावली. रोहित नेहमी ज्या 30 यार्ड सर्कलमध्ये फिल्डिंग करतो, त्याला थेट सीमारेषेवर पाठवले. पांड्याने रोहितला सीमारेषेवर जाण्याचा इशारा केला. यावर रोहितने मी जाऊ का?, असा इशारा दिला, त्यानंतर पांड्याने तुम्ही जा असे स्पष्ट केले. यानंतर रोहित फील्डिंगसाठी लाँग-ऑनकडे जातो आणि तिथे उभा राहतो. सीमारेषेवर गेल्यावरही पांड्याने रोहितला त्याच्या जागेवरून २ ते ३ वेळा हलवले.
दरम्यान, रोहितच्या समर्थनार्थ पोस्टर घेऊन स्टेडियमवर पोहोचले. ज्यावर ‘रोहित शर्मा कॅप्टन फॉरएव्हर’ आणि ‘मुंबई चा राजा रोहित शर्मा’ असे स्लोगन लिहिले होते.
हे ही वाचा :
JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ
‘बदला’ घेणे एवढाच उद्देश; डॉ.अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका
वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा
…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी अंकिता लोखंडेनं एकही रूपया घेतला नाही; वाचा काय आहे कारण !
महत्वाची बातमी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह ‘हे’ बारा ओळखपत्र ग्राह्य धरणार
अंगाला रंग लावून दोन मुलींचे अश्लिल चाळे, मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल !
शिवसेना राज ठाकरेंकडे जाणार ?, फडणवीस म्हणाले हे खरं आहे….